शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

‘राणेंच्या पराभवासाठी स्वपक्षातील लोक पुरेसे’

By admin | Updated: April 8, 2015 02:12 IST

नारायण राणेंच्या पराभवासाठी मला काही करायची गरज नाही. त्यासाठी त्यांच्या लोक पुरसे आहेत. त्यामुळे त्यांचा पराभव निश्चित आहे,

मुंबई : नारायण राणेंच्या पराभवासाठी मला काही करायची गरज नाही. त्यासाठी त्यांच्या लोक पुरसे आहेत. त्यामुळे त्यांचा पराभव निश्चित आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणेंवर पलटवार केला. वांद्रे शासकीय वसाहतीतील मैदानावर शिवसेना उमेदवार तृप्ती सावंत यांच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, तासगावच्या पोटनिवडणुकीत आम्ही उमेदवार दिला नाही. त्याच पध्दतीने वांद्रे पूर्वमध्ये काँग्रेस आघाडीने उमेदवार उभा करायला नको होता. पण, त्यांच्यात आमच्यासारखे सौजन्य नाही. दिवंगत बाळा सावंत खरे लोकप्रतिनिधी होते. २४ तास लोकांची सेवा करणारे आमदार होते. हा त्यांचा आणि बाळासाहेब ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. हे लक्षात ठेऊन मतदान करा, असे आवाहन फडणवीस यांनी केले.छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक असो वा इंदू मिल येथील बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक, १५ वर्षांत या स्मारकासाठी एकाही गोष्टीची परवानगी आघाडी सरकारने मिळवली नाही. युती सरकारने सत्तेत येताच केंद्र सरकारकडून सर्व परवानग्या मिळविल्या. मागच्या सरकारने या दोन्ही स्मारकावरून फक्त राजकारण करत महापुरुषांच्या नावावर फक्त मते मागितल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. इतके दिवस यांना वांदे्र वसाहतीतील कर्मचा-यांना मालकी हक्काने घरे देण्याची आठवण झाली नाही. सत्तेत नसताना केले नाही, ते आता कसे करणार, असा सवालही मुख्यमंत्र्यांनी केला. सरकारी कर्मचा-यांच्या घरांचा प्रश्न सोडविण्यासाठी महिनाभरात योजना सादर करु, असेही ते यावेळी म्हणाले. (प्रतिनिधी)