सदाशिवराव मंडलिक यांचे निधन

By Admin | Updated: March 11, 2015 02:04 IST2015-03-11T02:04:19+5:302015-03-11T02:04:19+5:30

कोल्हापूरचे माजी खासदार सदाशिवराव दादोबा मंडलिक यांचे सोमवारी मध्यरात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मुंबईत खासगी रुग्णालयात

Sadashivrao Mandalik dies | सदाशिवराव मंडलिक यांचे निधन

सदाशिवराव मंडलिक यांचे निधन

कोल्हापूर : कोल्हापूरचे माजी खासदार सदाशिवराव दादोबा मंडलिक यांचे सोमवारी मध्यरात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मुंबईत खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते़ कागल तालुक्यातील मुरगूड येथे जय शिवराय शिक्षण संस्थेच्या प्रांगणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले़ यावेळी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. त्यांच्या पश्चात मुलगा संजय, तीन मुली व नातवंडे असा परिवार आहे.
मंडलिक यांना गेल्या चार वर्षांपासून किडनीचा त्रास होता. तो जास्त झाल्याने गेल्या आठवड्यात त्यांना येथीलच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आठवड्यातून तीन वेळा त्यांचे डायलेसिस करण्यात येत होते. प्रकृतीत फारशी सुधारणा होत नसल्याने सोमवारी सकाळीच त्यांना मुंबईला खासगी रुग्णालयात हलविले. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

Web Title: Sadashivrao Mandalik dies