शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

बाटलीबंद पाण्याला २० रुपये अन् दुधाला १७ रुपये दर, हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे - राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 11:50 AM

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याकडून दुधाचा अभिषेक घालून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.

ठळक मुद्देपाण्यापेक्षा या अमृताला कमी भाव, आमच्या आया-बहिणी राबराब राबतात, त्या माऊलींच्या भावनांची किंमत नाही का? असा सवाल राजू शेट्टी यांनी केला.

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज दूध दरवाढीसाठी राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे. गायी आणि म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर दहा रुपये वाढ मिळावी, केंद्र सरकारने दूध भुकटी आयात निर्णय बदलावा, यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरु आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याकडून दुधाचा अभिषेक घालून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. शिरोळ तालुक्यातील उदगाव येथील रामलिंग मंदिरात राजू शेट्टी यांनी दुग्धाभिषेक घालून आरती केली. यावेळी शंकर भगवानाला दुग्धाभिषेक करुन राज्य आणि केंद्र सरकारला सुबुद्धी देण्याचे साकडे घातल्याचे त्यांनी सांगितले.

पवित्र भावनेने आंदोलन हाती घेतले आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळेल ही आशा आहे, असे राजू शेट्टी म्हणाले. तसेच, आंदोलकांनी दूध ओतले तर त्याला नासाडी का म्हणायचे? पाण्यापेक्षा या अमृताला कमी भाव, आमच्या आया-बहिणी राबराब राबतात, त्या माऊलींच्या भावनांची किंमत नाही का? असा सवाल राजू शेट्टी यांनी केला.

अमृतासारखे दूध रस्त्यावर ओतताना होणारा त्रास समजून घ्या. दूध उत्पादक शेतकऱ्याला केवळ १७-१८ रुपये दर मिळत आहे. बाटलीबंद पाण्याला २० रुपये आणि दुधाला १७ रुपये दर मिळत आहे, हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे, असेही राजू शेट्टी यांनी म्हणाले.

दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात या आंदोलनाची तीव्रता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी टँकरची फोडाफोडी करण्यात आली तर काही ठिकाणी देवाला अभिषेक घालून तर कुठे बैलांना दुधाची आंघोळ घालून आंदोलन सुरु झाले.

साताऱ्यात टँकर चालकास दुधाचा अभिषेक घातला सातारा - कराड जवळ वाठार येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी टँकर अडवून टँकर चालकास दुधाचा अभिषेक घातला. दुधाला रास्त भाव मिळावा यासाठी राजू शेट्टी यांनी आज राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे. त्याला प्रतिसाद देत वाठार येथे दूध टँकर रोखण्यात आला पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या चार कार्यकर्त्यांना सध्या ताब्यात घेतले आहे.

 

आणखी बातम्या...

Oxford नंतर चीनची लस होतेय यशस्वी, कोरोनाशी लढण्याची वाढवते ताकद...

मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे निधन

दूध तापलं! स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुधाचा टँकर फोडला...

CoronaVirus News : धक्कादायक! मल्टीनॅशनल कंपनीत कोरोनाचा विस्फोट, २८८ कर्मचारी आढळले पॉझिटिव्ह

रावणाने पहिले विमान उड्डाण केले, सिद्ध करण्याचा श्रीलंकेचा दावा    

सरकारी कर्मचार्‍यांसाठी खूशखबर! नाईट शिफ्ट केली तर आता असा होणार फायदा...   

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीmilkदूधMilk Supplyदूध पुरवठाkolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्र