मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 07:55 AM2020-07-21T07:55:04+5:302020-07-21T07:55:33+5:30

गेल्या काही दिवसांपासून लालजी टंडन आजारी होते. त्यांच्यावर लखनऊ येथील रुग्णालयात उपचार सुरु होते.

Madhya Pradesh Governor Lalji Tandon passes away at 85 | मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे निधन

मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे निधन

Next

लखनऊ : मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर लखनऊ येथील मेदांता रुग्णालयात उपचार सुरु होते.

लालजी टंडन यांच्या निधनाची दु:खद वार्ता त्याचे पुत्र आणि उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री आशुतोष टंडन यांनी दिली. आशुतोष टंडन यांनी सकाळी 7 वाजता ‘बाबूजी नहीं रहे’ असे ट्वीट करून दिली. सोमवारी रात्री उशिरा लालजी टंडन यांची प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते, अशी माहिती मेदांता हॉस्पिटलचे संचालक डॉ. राकेश कपूर यांनी दिली होती. 


श्वासोच्छवास करताना त्रास होत असल्याने आणि ताप वाढल्याने लालजी टंडन यांना ११ जुलैला उपचारांसाठी मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  त्यानंतर 13 जुलैला त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. तसेच, यामुळे उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना मध्य प्रदेशचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.

लालजी टंडन हे १९७८-८४ या कालावधीत उत्तर प्रदेश विधानपरिषदेचे सदस्य होते. तर १९९६ ते २००९ दरम्यान सलग तीन वेळा ते विधानसभेवर निवडून आले. बसप-भाजपा युती सरकारमध्ये मायावतींच्या नेतृत्वात त्यांनी उत्तर प्रदेश मंत्रिमंडळात नगरविकास मंत्री म्हणूनही काम पाहिले होते. याशिवाय, लालजी टंडन यांनी बिहारचे राज्यपालपदही भूषवले आहे.
 

आणखी बातम्या...

दूध तापलं! स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुधाचा टँकर फोडला...

CoronaVirus News : धक्कादायक! मल्टीनॅशनल कंपनीत कोरोनाचा विस्फोट, २८८ कर्मचारी आढळले पॉझिटिव्ह

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची लागण    

रावणाने पहिले विमान उड्डाण केले, सिद्ध करण्याचा श्रीलंकेचा दावा    

सरकारी कर्मचार्‍यांसाठी खूशखबर! नाईट शिफ्ट केली तर आता असा होणार फायदा...   

Web Title: Madhya Pradesh Governor Lalji Tandon passes away at 85

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.