दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज एका पत्रकार परिषदेत खळबळजनक दावे करत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातील वरिष्ठ नते सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्यावर गंभीर आरोप केले. आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. यावर सुनील तटकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून रोहित पवारांनी आधी स्वतःच्या पक्षात काय सुरू आहे ते पहावे, असा त्यांनी सल्ला दिला.
"अजित पवारांच्या निधनानंतर अवघ्या १८ व्या दिवशी, म्हणजेच १६ फेब्रुवारी २०२६ रोजी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हालचाली सुरू केल्या होत्या. प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवले. या पत्राद्वारे त्यांनी पक्षाच्या संविधानात बदल केल्याचा खोटा दावा केला. तसेच पक्षाचे सर्व सर्वाधिकार कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांना देण्याची मागणी या नेत्यांनी केली.हे सर्व करताना त्यांनी सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांना विश्वासात घेतले नव्हते", असा आरोप करत रोहित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली.
रोहित पवारांच्या आरोपांवर सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण
रोहित पवारांच्या या आरोपांनंतर खासदार सुनील तटकरे यांनी तातडीने प्रतिक्रिया देत पलटवार केला आहे. रोहित पवारांनी प्रसिद्धीसाठी हे आरोप केल्याचे त्यांनी म्हटले आहे. तटकरे म्हणाले की, "रोहित पवारांनी आमच्या पक्षाबद्दल बोलण्यापेक्षा आधी त्यांच्या स्वतःच्या पक्षात काय सुरू आहे, याकडे लक्ष द्यावे. अजित दादा जिवंत असतानाही मला टार्गेट केले गेले होते. उलट, पक्ष ताब्यात घेण्याची घाई रोहित पवारांनाच झाली होती." ते पुढे म्हणाले की, "दादांच्या अपघातानंतर नेमके काय घडले, याची सर्व माहिती माझ्याकडे आहे. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यांनी माझ्यावर हे आरोप केले आहेत. त्यांनी आमच्या पक्षाच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करणे थांबवावे."
महाराष्ट्राच्या राजकारणा ठिगणी पडण्याची शक्यता
अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या गटाचे नेतृत्व कोणाकडे जाणार? यावरून वाद सुरू असल्याचे रोहित पवारांच्या आरोपांवरून सूचित होत आहे. विशेषतः पवार कुटुंबियांना बाजूला सारून पक्ष संघटना ताब्यात घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा केल्याने आगामी काळात या वादाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
Web Summary : Sunil Tatkare refuted Rohit Pawar's allegations about power struggles within Ajit Pawar's party after Ajit's death. Tatkare advised Rohit to focus on his own party's issues and accused him of seeking publicity.
Web Summary : सुनील तटकरे ने अजित पवार की मृत्यु के बाद अजित पवार की पार्टी में सत्ता संघर्ष के बारे में रोहित पवार के आरोपों का खंडन किया। तटकरे ने रोहित को अपनी पार्टी के मुद्दों पर ध्यान केंद्रित करने की सलाह दी और उन पर प्रचार पाने का आरोप लगाया।