Rohit Pawar : आत्महत्या दाखवून भोंदू खरातला संपवण्याचा डाव, सत्य लपवण्याचा अट्टहास का? - रोहित पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 13:30 IST2026-03-31T13:28:54+5:302026-03-31T13:30:15+5:30
Rohit Pawar And Ashok Kharat : रोहित पवार यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून याबाबत ट्वीट केलं आहे.

Rohit Pawar : आत्महत्या दाखवून भोंदू खरातला संपवण्याचा डाव, सत्य लपवण्याचा अट्टहास का? - रोहित पवार
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता तपास अधिक गूढ होत चालला असून खरातच्या मोबाईलमधून उघड झालेल्या माहितीमुळे तपास यंत्रणांच्या हातात महत्त्वाचे धागेदोरे आले आहेत. खरातच्या मोबाईलमध्ये अडीच हजारांहून अधिक फोन नंबर सेव्ह आहेत. मात्र या नंबरपैकी अनेक नंबर 'कोडवर्ड'मध्ये सेव्ह करण्यात आले असून त्याचा अर्थ उलगडणं हे तपास पथकासमोर आव्हान ठरलं आहे. याच दरम्यान रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आत्महत्या दाखवून भोंदू खरातला संपवण्याचा डाव असल्याचा खळबळजनक आरोप रोहित यांनी केला आहे. तसेच "सत्य लपवण्यासाठी एवढा अट्टहास का? अशाने सत्य लपणार आहे का?" असा सवाल विचारला आहे. रोहित पवार यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून याबाबत ट्वीट केलं आहे. "खूप काही जणांची खूप काही माहिती असलेल्या भोंदू खरातचे धागेदोरे मोठमोठ्या नेत्यांपर्यंत येऊन पोहचल्याने आत्महत्या किंवा इतर काही दाखवून खरातला संपवायचं तर दुसरीकडं अजितदादांच्या अपघाताची इत्तंभूत माहिती असलेल्या व्ही के सिंगला काहीही झालं तरी वाचवायचं अशा चर्चा आहेत."
खूप काही जणांची खूप काही माहिती असलेल्या भोंदू खरातचे धागेदोरे मोठमोठ्या नेत्यांपर्यंत येऊन पोहचल्याने आत्महत्या किंवा इतर काही दाखवून खरातला संपवायचं तर दुसरीकडं अजितदादांच्या अपघाताची इत्तंभूत माहिती असलेल्या व्ही के सिंगला काहीही झालं तरी वाचवायचं अशा चर्चा आहेत.
\— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 31, 2026
दोषींना…
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे, पण सत्य दडपण्यासाठी कोणाचा जीव घेतला जात असेल किंवा सत्य दडपण्यासाठी कोणाला दोषातून वाचवलं जात असेल तर या दोन्ही बाबी योग्य नाहीत. अशी राजकीय रणनीती कुणी आखत असेल तर महाराष्ट्राच्या जनतेला हे अजिबात आवडणार तर नाहीच उलट लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वास उडेल."
अशोक खरातचा पिस्तूल परवाना रद्द; फार्महाऊसवर सापडली २१ काडतुसं, ८ गुन्हे दाखल
"... तर तुझा मृत्यू अटळ", भोंदूबाबा अशोक खरातने थेट तुर्कस्थानातून मागवलं ९० लाखांचं फर्निचर
"सत्य लपवण्यासाठी एवढा अट्टहास का? अशाने सत्य लपणार आहे का? असो, ‘कितीही प्रयत्न केला तरी सत्य लपवता येत नाही, ते कधीतरी बाहेर येतंच’ याचा अनेकांना विसर पडलेला दिसतोय" असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी सत्य_बाहेर_यायलाच_पाहिजे, JusticeForTruth, सत्य_लपणार_नाही असे हॅशटॅग देखील वापरले आहेत.