शहरं
Join us  
Trending Stories
1
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
2
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
3
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
4
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
5
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
6
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
7
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
8
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
9
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
10
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
11
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
12
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
13
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
14
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
15
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
16
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
17
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
18
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
19
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
20
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

लुटमार करणारे तिघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 23:35 IST

पानटपरीचालकास मारहाण करून लुटणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी दुपारी अटक केली. ही घटना सोमवारी रात्री ११ च्या सुमारास फे्रजरपुरा हद्दीतील फॉरेस्ट कॉलनीपुढील मार्गावर घडली.

ठळक मुद्देफ्रेजरपुरा हद्दीतील घटना : गुन्हे शाखेची कारवाई, कार जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पानटपरीचालकास मारहाण करून लुटणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी दुपारी अटक केली. ही घटना सोमवारी रात्री ११ च्या सुमारास फे्रजरपुरा हद्दीतील फॉरेस्ट कॉलनीपुढील मार्गावर घडली. अन्नू ऊर्फ अन्वर रंगारी अब्दुल समद (३०, रा. जुना सराफा), विक्की अविनाश बंड (२५, रा. दहीसाथ) व आशिष ऊर्फ हरी कीर्तीकुमार गोटी (३०, रा. दहिसाथ) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलीस सूत्रानुसार, बुºहान चंदू रायलीवाले (४६, रा. गवळीपुरा) यांचा यशोदानगर चौकात पानटपरीचा व्यवसाय आहे. तो सोमवारी रात्री पानटपरी बंद करून दुचाकीने घरी जात असताना, फॉरेस्ट कॉलनी मार्गावर कारमधून आलेल्या तिघांनी बुºहानला अडवून बेदम मारहाण केली आणि पाच हजारांची रोख जबरीने हिसकावून नेली. घटनेच्या तक्रारीवरून फे्रजरपुरा पोलिसांनी तीन अज्ञातांविरुद्ध भादंविच्या कलम ३९४, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. दरम्यान, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक व गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रमेश आत्राम यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक राम गितेंसह पथकातील सुभाष पाटील, सुलतान बन, विनय मोहोड, शेखर रामटेके, सुनील बाजगिरे व चालक प्रधान यांनी तक्रारकर्त्याने सांगितलेल्या वर्णनावरून आरोपींचे शोधकार्य सुरू केले. पोलिसांनी दोन आरोपींना कोतवाली हद्दीतून अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली असून, रोख जप्तीसाठी आरोपींची कसून चौकशी सुरू आहे.