शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

रायसोनी समूहाच्या १३ पदाधिकाऱ्यांना अटक

By admin | Updated: October 7, 2016 19:18 IST

विविध योजनांचे आमिष दाखवून गुतंवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या भाईचंद हिराचंद रायसोनी समूहाच्या (बीएचआर) १३ पदाधिकाऱ्यांना राज्य गुन्हे

ऑनलाइन लोकमतअमरावती, दि. 07 -  विविध योजनांचे आमिष दाखवून गुतंवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या भाईचंद हिराचंद रायसोनी समूहाच्या (बीएचआर) १३ पदाधिकाऱ्यांना राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शुक्रवारी अटक केली. न्यायालयाने १३ आरोपींना १० आॅक्टोबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. बीएचआरच्या राजापेठस्थित शाखेने गुतवंणूकदारांची तब्बल १० कोटी ५२ लाख रुपयांनी फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. संचालक प्रमोद भाईचंद रायसोनी, दिलीप कांतीलाल चोरडीया, मोतीलाल ओंकार गिरी, सूरजमल जैन, हितेंद्र महाजन, भागवत माळी, राजाराम कोळी, दादा पाटील, भगवान वाघ, इंद्रकुमार लालवाणी, शेख रहमान शेख अब्दूल नबी, सुखलाल माळी व यशंवत गिरी अशी आरोपींची नावे आहेत. बीएचआरच्या भारतभरात २५० शाखा असून अमरावती जिल्ह्यात अंजनगाव, खोलापुरी गेट व राजापेठ या तीन ठिकाणी शाखा होत्या. या तीनही शाखांच्या माध्यमातून बीएचआरच्या पदाधिकाऱ्यांनी गुतवंणूकदारांकडून कोट्यवधींची रक्कम गोळा करून पोबारा केला. याबाबत ३० मार्च २०१५ रोजी राजापेठ पोलीस ठाण्यात राधेश्याम चांडक यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ४०९, ४२०, ४६८, १२० (ब), एमपीआयडीनुसार गुन्हा नोंदविला होता. यामध्ये चांडक यांची २ लाखांनी फसवणूक केल्याची तक्रार करण्यात आली. त्याचप्रमाणे आरोपींनी गुतवणुकदारांची १० कोटी ५२ लाखांची फसवणूक केल्याचे उघड झाले होते. राजापेठ पोलिसांच्या चौकशीनंतर हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. त्यानंतर डिसेंबर २०१५ मध्ये हा तपास राज्य अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत होते. दरम्यान जळगाव पोलिसांनी बीएचआरच्या संचालकासह १३ पदाधिकाऱ्यांना अटक केली. या आरोपींना सीआयडीने प्रोड्यूस वाँरटवर ताब्यात घेतले असून शुक्रवारी अमरावतीत आणले. पोलीस उपअधीक्षक एस.डी.सोळंके यांच्या नेतृत्वात हेड कॉन्स्टेबल गजानन पवार, नितीन पेठे यांच्या पथकाने आरोपींना अटक केली आहे. तेराही आरोपींना शुक्रवारी जिल्हा न्यायाधीश व विशेष न्यायाधीश (मकोका) ज्ञा.वा.मोडक यांच्या न्यायालयात हजर करण्यात आल्यावर सरकारी पक्षातर्फे दीपक आंबलकर यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयाने १३ आरोपींना १० आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या आरोपींना राजापेठ पोलीस ठाण्यातील कोठडीत ठेवण्यात आले आहे. बीएचआरने राजापेठ परिसरातील शाखेमार्फत गुंतवणूकदारांची १० कोटी ५२ लाखांनी फसवणूक केल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी १३ जणांना जळगावहून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपींना १० आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. - एस.डी.सोळंके, पोलीस उपअधीक्षक, सीआयडी, अमरावती