शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा-टॅक्सीच्या भाड्यात प्रत्येकी १ रुपया वाढ

By admin | Updated: May 12, 2015 02:45 IST

हकिम समितीने केलेल्या शिफारसीनुसार रिक्षा, टॅक्सीच्या भाड्यात एक रुपया वाढ करण्याचा निर्णय एमएमआरटीएने (मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरण) सोमवारी

मुंबई - हकिम समितीने केलेल्या शिफारसीनुसार रिक्षा, टॅक्सीच्या भाड्यात एक रुपया वाढ करण्याचा निर्णय एमएमआरटीएने (मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरण) सोमवारी झालेल्या बैठकीत घेतला. ही भाडेवाढ १ जूनपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल,कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, मिरा-भार्इंदर, उल्हासनगरसह अन्य एमएमआरटीए क्षेत्रात लागू केली जाणार आहे. त्यामुळे रिक्षाचे भाडे १७ वरुन १८ रुपये तर टॅक्सीचे भाडे २१ वरुन २२ रुपये होईल. तत्पूर्वी हकिम समितीच्या वैधतेला मुंबई ग्राहक पंचायतीने यापूर्वीच हायकोर्टात आव्हान दिल्याने राज्य सरकारला ही भाडेवाढ लागू करण्यासाठी हायकोर्टाकडूनही परवानगी घेणे आवश्यक असल्याने येत्यातीन ते चार दिवसांत हायकोर्टातही या भाडेवाढीची माहीती सादर केली जाणार आहे. वाढणारे इंधनाचे दर, देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च आणि महागाईचा विचार करता प्रत्येक वर्षाच्या १ मेपासून रिक्षा आणि टॅक्सींच्या भाड्यात वाढ करण्याची शिफारस हकिम समितीकडून करण्यात आली आहे. ही शिफारस २७ जुलै २०१२ रोजी केल्यावर आॅक्टोबर २०१२ पासूनच रिक्षा आणि टॅक्सी भाड्यात वाढ करण्यात आली होती. त्या वेळी रिक्षाचे भाडे १५ रुपये आणि टॅक्सीचे भाडे १९ रुपये करण्यात आले होते. हकिम समितीच्या शिफारसीनुसार २0१३ च्या मे महिन्यात भाडेवाढीसाठी रिक्षा-टॅक्सी संघटनांकडून पुन्हा प्रयत्न करण्यात आले होते. मात्र या नविन भाडेवाढीविरोधात ग्राहक पंचायतीने धाव घेतली होती. अखेर न्यायालयाने दिलेल्या मंजुरीनंतर आॅगस्ट २0१४ पासून हकिम समितीच्या शिफारसीनुसार रिक्षा आणि टॅक्सीचे भाडे दोन रुपयांनी वाढविण्यात आले. त्यामुळे रिक्षाचे भाडे १७ तर टॅक्सीचे भाडे २१ रुपये झाले होते. प्रत्येक वर्षी मे महिन्यात हकिम समितीच्या शिफारसीनुसार भाडेवाढ होत असल्याने यंदाही भाडेवाढ मिळावी अशी मागणी रिक्षा आणि टॅक्सी संघटनांची होती. त्यानुसार सोमवारी एमएमआरटीएच्या झालेल्या बैठकीत रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात प्रत्येकी एक रुपया वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. १ जूनपासून ही भाडेवाढ लागू होणार आहे. आॅक्टोबर २0१२ पासून नविन भाडेवाढ हकिम समितीनुसार करण्यात आली होती. त्यानंतर २0१३ च्या मे महिन्यात भाडेवाढ मिळावी म्हणून रिक्षा आणि टॅक्सी संघटनांकडून प्रयत्न करण्यात्२ा आले होते.मात्र २0१२ च्या आॅक्टोबर महिन्यात भाडेवाढ झाल्यावर त्यानंतरच्या २0१३ च्या नविन भाडेवाढीविरोधात ग्राहक संघटनेकडून न्यायालयात धाव घेण्यात आली होती. मात्र न्यायालयाने या भाडेवाढीला मंजुरी दिली आणि आॅगस्ट २0१४ रोजी नविन भाडेवाढ लागू झाली. परंतु जेव्हा नविन भाडेवाढ लागू कराल तेव्हा न्यायालयात त्याची माहीती द्यावीच लागेल, असे न्यायालयाने सांगितले होते. एमएमआरटीएकडून येत्या तीन ते चार दिवसांत न्यायालयात भाडेवाढीची माहिती सादर केली जाईल.