शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा, टॅक्सीचे भाडे दोन रुपयांनी वाढले

By admin | Updated: August 13, 2014 03:40 IST

गेल्या महिन्यात रेल्वे आणि लोकलचा प्रवास महागल्यानंतर आता मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत रिक्षा, टॅक्सीतून प्रवास करणेही महागले आहे

मुंबई : गेल्या महिन्यात रेल्वे आणि लोकलचा प्रवास महागल्यानंतर आता मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत रिक्षा, टॅक्सीतून प्रवास करणेही महागले आहे. रिक्षा आणि टॅक्सींचे किमान भाडे दोन रुपयांनी वाढवण्याला उच्च न्यायालयाने मंगळवारी मंजुरी दिली. यामुळे प्रवाशांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे. दोन रुपये भाडेवाढीमुळे रिक्षाचे किमान भाडे १५ रुपयांवरून १७ रुपये तर टॅक्सीचे किमान भाडे १९ रुपयांवरून २१ रुपये होणार आहे. न्या़ अभय ओक यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले़ तसेच भाडेवाढ करण्याचे अधिकार शासनाला असून, तांत्रिक मुद्द्यांवर झालेल्या भाडेवाढीवर शिक्कामोर्तब करण्यास वारंवार शासनाला न्यायालयात येण्याची आवश्यकता नसल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले़ शासनाने नुकतीच ही भाडेवाढ जाहीर केली होती़ त्याविरोधात मुंंंबई ग्राहक पंचायतने अ‍ॅड़ उदय वारूंजीकर यांच्यामार्फत याचिका दाखल केली तर रिक्षा-टॅक्सी युनियनने ही भाडेवाढ तत्काळ लागू करावी, अशी मागणी करणारी स्वतंत्र याचिका दाखल केली़ त्यावर न्यायालयाने या भाडेवाढीचा मार्ग मोकळा केला़मात्र मीटरच्या रिकॅलिब्रेशनशिवाय ही भाडेवाढ शक्य नसल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले. रिकॅलिब्रेशनपूर्वीच जादा भाडे आकारणाऱ्या रिक्षा-टॅक्सीचालकांवर कठोर कारवाई करू, असा इशारा अप्पर परिवहन आयुक्त सतीश सहस्रबुद्धे यांनी दिला आहे.