शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात ५४ विधवांना दिले रिक्षा परमीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2016 20:58 IST

मरण पावलेल्या रिक्षा चालकांच्या पत्नीच्या नावे परमीट करण्याचा सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रयोग राबविला आहे. याचा ५४ विधवांना लाभ मिळाला आहे.

- राजकुमार सारोळेसोलापूर : मरण पावलेल्या रिक्षा चालकांच्या पत्नीच्या नावे परमीट करण्याचा सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रयोग राबविला आहे. याचा ५४ विधवांना लाभ मिळाला आहे. सोलापूर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे परवानाधारक रिक्षांची संख्या ८५९३ हजार इतकी आहे. शहराच्या लोकसंख्येनुसार रिक्षा परमीटची संख्या वाढणे अपेक्षित होते. पण याला शासनाने परवानगी दिली नाही. त्यामुळे स्क्रॅप रिक्षांची संख्या वाढत गेली.

याबाबत ओरड झाल्यावर २00७ मध्ये दीड हजार वाढीव परवाने खुले झाले. आरटीओ कार्यालयाच्या स्थापनेनंतर हा एकदाच प्रयोग झाला. यात कित्येक परमीट धारक मरण पावले आहेत. त्यामुळे परमीटची संख्या कमी होत गेली. सध्या एसएमटीची (महापालिका परिवहन खाते) स्थिती पाहता शहरात रिक्षांची परमीट वाढविणे अपेक्षित आहे. या मागणीचा विचार करून तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी जिल्हा परिवहन प्राधीकरणच्या बैठकीत रिक्षा परमीट नूतनीकरणाबाबत धोरणात्मक निर्णय घेतला. जे परमीटधारक रिक्षाचालक मरण पावले आहेत. त्यांच्या पत्नीला उदरनिर्वाहाचे साधन म्हणून पतीचे लॅप्स झालेले परमीट पत्नीच्या नावे ट्रान्सर्फर करण्यास मंजुरी दिली. हा निर्णय मान्यतेसाठी शासनाकडे पाठविला. शासनाची मंजुरी मिळाल्यावर आरटीओ कार्यालयाने त्या पद्धतीने मोहीम हाती घेतली.

जिल्हा परिवहन प्राधीकरण बैठकीतील निर्णयानुसार आरटीओ कार्यालयाने मरण पावलेल्या परमीटधारक रिक्षा चालकांच्या पत्नीकडून अर्ज मागविले. याला चांगला प्रतिसाद मिळाला. यात १९८५ पासूनची यादी तपासल्यानंतर ५४ परमीट विधवांच्या नावे करण्यास मंजुरी देण्यात आली. आरटीओ कार्यालयाच्या इतिहासातील व राज्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याचे सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मेडशीकर यांनी सांगितले.शेतकऱ्याच्या पत्नीला मिळणार परमीटआतहत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियासाठी शासनाने हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वावलंबन निराधार योजना जाहीर केली आहे. सोलापूर जिल्ह्यात ६१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून १ लाखाचे अर्थसहाय्य मिळालेल्या अशा कुटुंबियांना कार्यालयाने संपर्क केला आहे. त्यांना परमीट देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. परमीटची ११ हजार फी आहे. शासनाने १0 हजार माफ करून एक हजारात हे परमीट देण्याचे धोरणठेवलेआहे.जिल्हा परिवहन प्राधीकरणच्या बैठकीतील निर्णयास अपवादात्मक स्थितीत शासनाने परवानगी दिली. ठिकाण व नियम एकच असल्याने मरण पावलेल्या ५४ रिक्षा परमीटधारकांचे परवाने पत्नीच्या नावे करण्यात आले. यामुळे त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटला आहे.बजरंग खरमाटे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी