शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

मारिया यांचा गृह विभागाकडे खुलासा

By admin | Updated: June 23, 2015 02:33 IST

फरार ललित मोदी यांची २०१४ साली लंडनमध्ये भेट घेतल्याचे वृत्त आल्यानंतर दुसऱ्या दिवशीच मुंबईचे विद्यमान पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी सोमवारी

डिप्पी वांकाणी, मुंबईफरार ललित मोदी यांची २०१४ साली लंडनमध्ये भेट घेतल्याचे वृत्त आल्यानंतर दुसऱ्या दिवशीच मुंबईचे विद्यमान पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी सोमवारी यासंदर्भात गृह विभागाकडे खुलासा सादर केला. गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यास दुजोरा दिला असून यासंदर्भात अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. दरम्यान, या खुलाशात मारीया यांनी गृह विभागाचे माजी अतिरिक्त सचिव अमिताभ राजन हेही परिषदेत सहभागी होण्यासाठी लंडन दौऱ्यावर आले होते, असे नमूद केले आहे. स्कॉटलंड यार्डच्या अधिकाऱ्यांना मारिया यांनी १७ जुलै रोजी एक व्याख्यान दिले होते. यावेळीच मारीया यांची मोदींशी संक्षिप्त भेट झाली होती. लंडनहून परतल्यानंतर खंडणीविरोधी विभागालाही या भेटीचा तपशील सादर केल्याचे मारिया यांनी खुलाशात म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले.‘मला आताच मारीया यांच्याकडून खुलासा प्राप्त झाला आहे. मात्र, सध्या याविषयी मी कोणतीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही. अद्याप मी हा खुलासा पाहिला नाही,’ अशी माहिती गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के. पी. बक्षी यांनी दिली. गेल्या शनिवारी माजी आयपीएल आयुक्त ललित मोदी यांच्यासोबतचे छायाचित्र माध्यमात आल्यानंतर मारीया यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सक्तवसूली संचालनालयात मोदीविरुद्ध सुमारे १६ तक्रारी प्रलंबित असून अशा तो सध्या लंडनमध्ये आहे. माध्यमात वृत्त झळकल्यानंतर मारीया यांनी तत्वरीत निवेदन जारी करून आपण अधिकृत लंडन दौऱ्यावेळी ललित मोदी यांच्या वकीलाची भेट घेतल्याचे सांगितले. एका परिषदेला गेल्यानंतर आपली मोदींशी काही काळ भेट झाल्याची कबुलीही त्यांनी या निवेदनात दिली होती.दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीसंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत. मोदी यांना भारत सरकारकडून पासपोर्ट मिळवून देण्यात मदत केल्याप्रकरणी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे हे याआधीचे आरोपांच्या चक्रात सापडले आहेत. ललित मोदीने अंडरवर्ल्डपासून आपले संरक्षण करण्यासाठी मुंबई पोलिसांना विनंती केली होती. मात्र, आपल्या अधिकारक्षेत्रात हा मुद्दा येत नसून यासंदर्भात तक्रार दाखल करायची असल्यास मुंबईला यावे, असे आपण मोदींना सांगितल्याचे मारिया यांनी निवेदनात सांगितले.