शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

खटुआ समितीचा अहवाल, सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय जैसे थे! संघटनांचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2020 07:04 IST

खटुआ समितीचा अहवाल; राज्यातील कर्मचारी संघटनांकडून तीव्र प्रतिक्रिया

मुंबई : राज्य सरकारीकर्मचारी व अधिकारी यांच्या सेवानिवृत्तीचे वय जैसे थे म्हणजेच ५८ वर्षेच ठेवावे, अशी शिफारस निवृत्त सनदी अधिकारी बी.सी.खटुआ यांच्या समितीने केल्याचे समोर आल्याने निवृत्तीचे वय ६० वर्षे करण्याºया कर्मचारी व अधिकारी संघटनांनाजबर धक्का बसला आहे. समितीने दिलेला अहवाल अत्यंत एकांगी असून तो शासनाने स्वीकारू नये, अशी मागणी राजपत्रित अधिकारी महासंघाने केली आहे.

खटुआ समितीने दोन वर्षांपूर्वीच अहवाल दिला होता; मात्र तो समोर आलाच नाही. हा अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी कर्मचारी संघटना सातत्याने करीत होत्या. तरीही आधीचे व आताचे सरकार दाद देत नव्हते. शेवटी एका व्यक्तीने माहितीच्या अधिकारात हा अहवाल मिळवला आणि निवृत्तीचे वय ५८ वर्षे ठेवावे अशी शिफारस समितीने केल्याचे उघड झाले. एवढेच नव्हे तर ‘वर्ग ड’ च्या कर्मचाऱ्यांचे सध्याचे निवृत्तीचे वय ६० वर्षे आहे, मात्र ते देखील ५८ करावे अशी शिफारस या समितीने केली आहे. मात्र जे गुणवत्ताधारक कर्मचारी आहेत आणि ज्यांना ६० वर्षापर्यंत काम करण्याची इच्छा आहे; त्यांना संधी द्यावी अशी विरोधाभासी शिफारसदेखील समितीने केली. निवृत्तीचे वय सरसकट ६० वर्षे करण्याची समितीने शिफारस केलेली नाही.

समितीसमोर कर्मचारी-अधिकारी संघटनांनी मांडलेली भूमिका, २३ राज्यांमध्ये निवृत्तीचे वय ६० वर्षे असणे, निवृत्तीचे वय वाढविल्याने अनुभवी कर्मचाऱ्यांचा शासनास होणारा फायदा या बाबींची दखल समितीने अहवालात घेतल्याचे दिसत नाही. मात्र त्याच वेळी सोलापूर जिल्ह्यात कार्यरत जलसंपदा विभागाच्या एका उत्साही उपअभियंत्याने ४९६८ कर्मचारी व नागरिकांची मते जाणून घेतली. त्यात बहुतांश लोकांचा निवृत्तीचे वय ६० करण्यास विरोध होता असा अजब निष्कर्ष समितीने अहवालात मांडला आहे. हा निष्कर्ष अत्यंत हास्यास्पद व निराधार असल्याची टीका कर्मचारी संघटनांनी केली आहे.खटुआ समितीचा अहवाल अत्यंत अनाकलनीय आहे. भाडोत्री माणसांकडून तो तयार करून घेतलेला दिसतो. यापुढे असा कुचकामी आणि बेजबाबदार अहवाल कोणी देऊ नये याची काळजी सरकारने घ्यावी. - ग. दि.कुलथे, नेते, राजपत्रित अधिकारी महासंघ.ड वर्ग कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६० वरून ५८ करण्याची खटुआ समितीची शिफारस अत्यंत अन्यायकारक आहे. - भाऊसाहेब पठाण, अध्यक्ष, चतुर्थ श्रेणी सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनाएक अत्यंत टुकार, मनमानी अहवाल देऊन खटुआ समितीने कर्मचाऱ्यांच्या तोंडाला अक्षरश: पाने पुसली आहेत. - विश्वास काटकर, सरचिटणीस राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना

 

टॅग्स :State Governmentराज्य सरकारEmployeeकर्मचारी