शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आॅटोरिक्षा परवाना नूतनीकरणाला थंडा प्रतिसाद

By admin | Updated: October 24, 2015 03:54 IST

राज्यातील १ लाख ४० हजार आॅटोरिक्षा परवान्यांचे नूतनीकरण करण्याच्या परिवहन विभागाच्या योजनेला थंडा प्रतिसाद मिळाल्याने आॅक्टोबर महिनाअखेर संपणाऱ्या

- संदीप प्रधान,  मुंबईराज्यातील १ लाख ४० हजार आॅटोरिक्षा परवान्यांचे नूतनीकरण करण्याच्या परिवहन विभागाच्या योजनेला थंडा प्रतिसाद मिळाल्याने आॅक्टोबर महिनाअखेर संपणाऱ्या या योजनेला १६ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.परवान्याची मुदत संपल्यावर सहा महिन्यांत नूतनीकरणाकरिता अर्ज न केलेल्या व परिणामी परवाने रद्द झालेल्या आॅटोरिक्षांची संख्या १ लाख ४० हजार ६५ असून, सध्या या रिक्षा रस्त्यावर परवान्याखेरीज फिरत आहेत. त्यामुळे परिवहन विभागाने मुंबई महानगर क्षेत्रामध्ये २० हजार रुपये तर इतर क्षेत्रात १५ हजार रुपये सहमत शुल्क आकारणी करून परवान्यांचे नूतनीकरण करण्याची योजना जाहीर केली. १ ते ३१ आॅक्टोबर २०१५ या कालावधीत योजनेला प्रतिसाद देणे अपेक्षित होते. परिवहन आयुक्त कार्यालयाकडे या योजनेला लाभलेल्या प्रतिसादाबाबत विचारणा केली असता नेमक्या किती आॅटोरिक्षा चालकांनी प्रतिसाद दिला त्याची आकडेवारी ३१ आॅक्टोबरला काही दिवसांचा कालावधी बाकी असल्याने लागलीच उपलब्ध नाही. मात्र योजनेला थंडा प्रतिसाद लाभल्याची कबुली उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळेच योजनेला मुदतवाढ दिल्याचे सूत्रांनी सांगितले.शिवाय परवाने नसले तरीही या आॅटोरिक्षा रस्त्यावर धावत असल्याने जेव्हा कारवाईचा बडगा उगारला जाईल तेव्हा पाहू, असाच बहुतांश रिक्षा चालकांचा पवित्रा आहे.परिवहन विभागाने या योजनेची माहिती रिक्षा चालकांपर्यंत व्यवस्थित पोहोचवलेली नाही. परवान्याच्या नूतनीकरणाकरिता आपण सरकारकडे गेलो व अन्य काही तांत्रिक मुद्दे उपस्थित झाले तर आपल्यावर कारवाई होईल अशी भीती या योजनेची माहिती देण्याकरिता बोलावलेल्या बैठकीत रिक्षा चालकांनी व्यक्त केली होती. सरकारने केवळ योजनेला मुदतवाढ न देता योजनेबाबतचे गैरसमज दूर करण्याची गरज आहे. - नितेश राणे, स्वाभिमानी आॅटोरिक्षा चालक संघटनेचे नेतेसरकारने १९९७नंतर नवे रिक्षा परवाने दिले नाहीत. त्यामुळे परवान्याचे नूतनीकरण न करताच रिक्षा रस्त्यांवर धावत आहेत. सरकारच्या योजनेचा लाभ घेण्याकडे रिक्षा चालकांचा कल नाही. मागील सरकारने याच धर्तीवर दंड आकारून बेकायदा रिक्षा कायदेशीर करण्याची योजना आणली होती. त्या वेळी त्याला विरोध झाला होता. न्यायालयातही सरकारची योजना टिकली नाही. - ए.एल. क्वाड्रोस, मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे नेते