शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

महायुती सरकारमधील एका मंत्र्याचा राजीनामा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 08:21 IST

लोकसभा निवडणुकीच्या निकालात ज्यांना यश मिळालं अशा आमदारांना आणि मंत्र्यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो. 

मुंबई - नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून काही मंत्री, आमदारांना मैदानात उतरवलं होतं. त्यातील जे निवडणुकीत विजयी झाले त्यात मंत्री संदीपान भुमरे यांचाही समावेश होता. संदीपान भुमरे हे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेत. मविआच्या चंद्रकांत खैरे आणि एमआयएमचे इम्तियाज जलील यांचा भुमरेंनी पराभव केला. लोकसभेत विजयी झाल्यानंतर संदीपान भुमरे यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे सोपवला आहे.

याबाबत आमदार संजय शिरसाट म्हणाले की, लोकसभेची निवडणूक निवडून आल्यानंतर १४ दिवसांत २ पदांपैकी एकाचा राजीनामा द्यावा लागतो. संदीपान भुमरे हे आता दिल्लीत खासदार राहतील. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामा दिला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात किंवा त्यांच्याकडील विभागाचे निर्णय घेण्याचा अधिकार आता भुमरेंकडे राहिला नाही. भुमरेंकडील खाते हे मुख्यमंत्र्यांकडे आले आहे असं त्यांनी म्हटलं. 

मंत्रिमंडळ विस्तार कधी?

तसेच मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा आहेत. काहीजण आपापल्या परीने तर्क लढवत आहेत. कोणी काही ना काही तारखा देतोय. परंतु जोपर्यंत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ठरवत नाहीत तोपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही. त्यामुळे आमच्यासारख्यांना हा प्रश्न विचारण्यापेक्षा वरिष्ठ नेत्यांना हे विचारलं तर त्याचे योग्य उत्तर तुम्हाला मिळेल असं सांगत संजय शिरसाट यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य केले आहे.

पालकमंत्रिपदी कुणाला संधी? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले संदीपान भुमरे हे खासदार झाले आहेत. नियमानुसार भुमरेंना दोन्हींपैकी एकाच सभागृहाचे सदस्यत्व ठेवावे लागणार आहे. त्यांनी आमदारकी आणि मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर त्यांचेकडील रोहयो, फलोत्पादन खाते व पालकमंत्रिपदही रिक्त होणार आहे. त्या पदावर वर्णी लागावी, यासाठी शिंदेसेनेअंतर्गत जोरदार स्पर्धा लागल्याची माहिती आहे. भुमरे यांना पश्चिम मतदारसंघातून सर्वाधिक जास्त मताधिक्य देऊन आ. संजय शिरसाट हे मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद मिळण्यासह पालकमंत्रिपदाचे दावेदार असल्याचे बोलले जात आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पावसाळी अधिवेशनापूर्वी होईल, असा दावा सध्या सत्ताधारी करीत आहेत. विस्तार झाला तर शिरसाट यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.  

टॅग्स :Sandipan Bhumreसंदीपान भुमरेSanjay Shirsatसंजय शिरसाटShiv SenaशिवसेनाChandrakant Khaireचंद्रकांत खैरेEknath Shindeएकनाथ शिंदेlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल