शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

३५०० वर्षांपूर्वीच्या वस्तीचे अवशेष!

By admin | Updated: October 26, 2015 02:41 IST

शंखांपासून बांगड्या तयार करणाऱ्या कारागीरांची वस्ती माणगंगेकाठी सुमारे साडेतीन हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात असावी, अशा निष्कर्षाप्रत नेणारे पुरावे माण तालुक्यात सापडले आहेत

राजीव मुळ्ये, साताराशंखांपासून बांगड्या तयार करणाऱ्या कारागीरांची वस्ती माणगंगेकाठी सुमारे साडेतीन हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात असावी, अशा निष्कर्षाप्रत नेणारे पुरावे माण तालुक्यात सापडले आहेत. पृष्ठीय सर्वेक्षणात आढळलेले असंख्य अवशेष थेट सातवाहन काळात नेणारे असून, कारागीरांनी वापरलेली अवजारे उत्तर ताम्रपाषाणयुगातील असल्याचा अंदाज आहे.माण तालुक्यातील एका गावाजवळ माणगंगा नदीकिनारी प्रचंड संख्येने आढळलेले शंखांच्या बांगड्यांचे कातकाम केलेले तुकडे, बांगडी घासण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सहाणी, कोरीवकामासाठी वापरल्या जाणाऱ्या सूक्ष्माश्म अवजारांचे तुकडे पाहता, निर्यातीसाठी बांगड्या बनविण्याचा कारखानाच इथे अस्तित्वात होता, या निष्कर्षाप्रत अभ्यासक पोहोचले आहेत.सातारच्या जिज्ञासा इतिहास संशोधन संस्थेच्या सदस्यांनी हा ‘खजिना’ शोधून काढला असून, तिथे मोठ्या प्रमाणात अजूनही दिसत असलेल्या इतर अवशेषांना धक्का लागू नये, म्हणून त्यांनी ठिकाण गोपनीय ठेवले आहे. येथे अत्यंत प्राचीन संस्कृतीचा ठेवा गवसण्याची चिन्हे दिसू लागल्यानंतर उत्खननाशी संबंधित संस्थेशी संपर्क साधण्यात आला आहे. इथे सापडलेले शंख ‘टर्बुनिल्ला पायरम’ जातीचे असून, ते केवळ तामिळनाडू किंवा सौराष्ट्रातील खंबातच्या आखातात सापडतात. माणमध्ये सापडलेले शंख खंबातच्या आखातातील असावेत, असे दिसते. लाटेबरोबर वाहत आलेल्या मोठ्या शंखाच्या पोटात लहान शंख आढळतात, तेही इथे आढळले असून, बांगड्या बनविताना शंखाचा काढून टाकलेला गाभाही सापडला आहे. पांढरीच्या टेकाडांचे संरक्षण करून ठिकठिकाणी उत्खनन झाल्यास, निसर्ग पर्यटनाबरोबरच जिल्ह्यात ऐतिहासिक पर्यटनाला चालना मिळेल.- विक्रांत मंडपे, जिज्ञासा इतिहास संशोधन संस्था