शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कोयना भूकंपग्रस्तांना आरक्षण

By admin | Updated: February 13, 2015 01:17 IST

सरकारी नोक-यांमध्ये प्रकल्पग्रस्तांसाठी असलेल्या पाट टक्के आरक्षणातूनच भूकंपग्रस्तांना आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय फक्त लातूर व उस्मानाबाद

मुंबई : सरकारी नोक-यांमध्ये प्रकल्पग्रस्तांसाठी असलेल्या पाट टक्के आरक्षणातूनच भूकंपग्रस्तांना आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय फक्त लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांतील ५२ गावांपुरता मर्यादित नाही तर तो सातारा जिल्ह्यातील कोयना भूकंपग्रस्तांसह इतर जिल्ह्यांनाही लागू होतो, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी दिला.या आरक्षणासंबंधीचा शासन निर्णय (जीआर) सरकारने ९ आॅगस्ट १९९५ रोजी काढला होता. या ‘जीआर’चा लाभ कोयना धरणाच्या परिसरातील आणि खास करून सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातील भूकंपग्रस्त कुटुंबांनाही त्याचा लाभ ‘जीआर’ मधील शर्तींची पूर्तता होत असेल तर मिळू शकेल, असे न्या. अभय ओक व न्या. अजय गडकरी यांच्या खंडपीठाने जाहीर केले. मात्र कोयना परिसरातील १९९५नंतरच्या भूकंपग्रस्तांना हे लाभ लागू होतात की नाही हा प्रश्न न्यायालयाने अनिर्णित ठेवला.कोयना धरणाच्या परिसरात १९६७ व १९९३ मध्ये झालेल्या भूकंपांनी खास करून पाटण तालुक्यात बरीच हानी झाली होती. ‘जीआर’नुसार ज्यांची राहती घरे पूर्णपणे उद््ध्वस्त झाली किंवा धंदा-व्यवसाय उद््ध्वस्त होऊन ज्यांचे चरितार्थाचे साधन बंद झाले अशा भूकंपग्रस्त कुटुंबातील एक व्यक्ती सरकारी नोकरीत प्रकल्पग्रस्तांच्या ५ टक्के कोट्यातून आरक्षण मिळण्यास पात्र आहेत. कोयना भूकंपग्रस्त कुटुंबांपैकी जी कुटुंबे या ‘जीआर’च्या तारखेला या दोेन निकषांत बसणारी होती त्यांनाही आरक्षणाचा लाभ मिळू शकेल, असे न्यायालयाने नमूद केले.सुरेश विठ्ठल पवार आणि शंभुराज शिवाजीराव देसाई यांनी केलेल्या जनहित याचिका मंजूर करून हा निकाल दिला गेला. यामुळे सरकारने लातूर-उस्मानाबादचे भूकंपग्रस्त आणि कोयना भूकंपग्रस्त यांच्यात गेली २० वर्षे चालविलेल्या पक्षपाताचे निराकरण झाले आहे. परिणामी पात्रता निकषांत बसणाऱ्या कोयना भूकंपग्रस्तांनाही जिल्हाधिकाऱ्यांकडून आवश्यक दाखला घेऊन सरकारी नोकरीत आरक्षण घेता येऊ शकेल. (विशेष प्रतिनिधी)