शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अर्थ खात्याची श्वेतपत्रिका काढणार

By admin | Updated: November 4, 2014 03:20 IST

महाराष्ट्रात नव्यानेच सत्तारूढ झालेले सरकार अर्थ खात्याची श्वेतपत्रिका काढण्याची शक्यता आहे. तसे संकेत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी नागपुरात दिले.

नागपूर : महाराष्ट्रात नव्यानेच सत्तारूढ झालेले सरकार अर्थ खात्याची श्वेतपत्रिका काढण्याची शक्यता आहे. तसे संकेत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी नागपुरात दिले.मुनगंटीवार यांचे सोमवारी नागपूरमध्ये आगमन झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आघाडी सरकारच्या काळात सिंचन खात्यात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासोबतच राज्य सरकारने घेतलेले कोट्यवधी रुपयांचे कर्ज कुठे खर्च झाले, हे पैसे नेमके कुठे गेले हे तपासण्यासाठी अर्थखात्याची श्वेतपत्रिका काढण्याचा राज्य शासनाचा विचार आहे, यात जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे मुनगंटीवार म्हणाले. राज्यावर तब्बल ३ लाख ४४० कोटींच्या कर्जाचा डोंगर आहे. गेल्या ५ वर्षांत ९७ हजार कोटींचे कर्ज आघाडी सरकारने घेतले, मात्र विकास कुठेच दिसत नाही. घेतलेल्या कर्जाचे काय झाले, हे तपासण्यासाठीच ही श्वेतपत्रिका काढणार असल्याचे ते म्हणाले. भाजपाने श्वेतपत्रिका काढल्यास आघाडी सरकारच्या काळातील अर्थमंत्री अजित पवार यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)