शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

आता काढा ‘स्मार्ट’ रांगोळी

By admin | Updated: October 7, 2016 19:00 IST

गणेशोत्सव संपताच दसरा आणि दिवाळीेचे वेध लागतात. नवरात्रोत्सवाला सुरुवात झाल्यापासून दिवाळीच्या शेवटच्या दिवसापर्यंत सर्वत्र धामधूम सुरू असते.

- स्वप्निल जोशी, आॅनलाइन लोकमत गणेशोत्सव संपताच दसरा आणि दिवाळीेचे वेध लागतात. नवरात्रोत्सवाला सुरुवात झाल्यापासून दिवाळीच्या शेवटच्या दिवसापर्यंत सर्वत्र धामधूम सुरू असते. नवीन कपड्यांबरोबरच नवनवीन वस्तूंची खरेदी, घराची साफसफाई, सजावट, फराळ आणि मिठाई बनविण्याची लगबग प्रत्येक घरात बघायला मिळते. सणाचा आनंद साजरा करतानाच रांगोळी रेखाटनाचाही वेगळा आनंद महिला लुटताना दिसतात.दिवाळीमध्ये प्रत्येक घरासमोर सकाळी आणि संध्याकाळी विविध रंगांनी आणि नक्षींनी साकारलेल्या रांगोळ्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेतात. कुणी ठिपक्यांची रांगोळी, तर कुणी आकर्षक सजीव चित्रे रेखाटताना दिसतात. उत्सवाचे प्रतीक म्हणून रांगोळीकडे बघितले जाते, त्यामुळे आपली रांगोळी आकर्षक दिसावी यासाठी महिला विशेष प्रयत्न करताना दिसतात. रांगोळीसाठी बाजारात अनेक पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अलीकडे तर अनेक महिला गूगल सर्च इंजिनवर रांगोळीच्या डिझाइन शोधत असतात. परंतु यंदाच्या दिवाळीत रांगोळीची पुस्तके किंवा गूगल सर्च करण्याची आवश्यकता नाही. गूगल प्ले स्टोअरवर विविध रांगोळीचे अ‍ॅप उपलब्ध असून हे रांगोळीचे अ‍ॅप डाउनलोड करून विविध रांगोळीच्या कल्पना उपलब्ध होणार आहे.रांगोळी अ‍ॅपमध्ये ठिपक्यांच्या रांगोळीसह दिवाळी रांगोळी, गणेश रांगोळी, बंगाली रांगोळी, हृदयकमलम्, संक्रांती रथम्, सरस्वती, तुलसी, नवग्रह अशा विविध प्रकारातील रांगोळ्या अ‍ॅपमध्ये उपलब्ध आहेत. नुसतेच रांगोळीचे आकार किंवा नक्षी यापुरते मर्यादित न राहता रांगोळी कशी काढायला हवी, रांगोळीत रंग कसे भरायचे याचे वेगवेगळ्या टप्प्यात मार्गदर्शन दाखविण्यात आले आहे. त्यामुळे एखादी अवघड आणि क्लिष्ट वाटणारी रांगोळी अगदी सहजपणे रेखाटता येते. गूगल प्ले स्टोअरवर रांगोळी डिझाइन्स, आदर्श मोबाइल रांगोळी अ‍ॅप, व्हाइट क्लाउड्स रंगोली गॅलरी, संकेतिका सिंपल रंगोली डिझाइन्स, विकल्प रांगोळी असे विविध अ‍ॅप उपलब्ध आहेत. गूगल प्ले स्टोअरवर अनेक अ‍ॅप्स उपलब्ध असून, यातील काही अ‍ॅप इंटरनेट विना (आॅफलाईन) वापरता येत असल्याने यासाठी डाटा खर्च होत नाही.