शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

बाळंतपणाची रजा साडेसहा महिने

By admin | Updated: November 26, 2015 02:54 IST

प्रचलित कायद्यात सुधारणा करून नोकरदार महिलांना १२ ऐवजी २६ आठवड्यांची बाळंतपणाची रजा देण्यावर मंगळवारी येथे झालेल्या त्रिपक्षीय बैठकीत एकमत झाले.

नवी दिल्ली : प्रचलित कायद्यात सुधारणा करून नोकरदार महिलांना १२ ऐवजी २६ आठवड्यांची बाळंतपणाची रजा देण्यावर मंगळवारी येथे झालेल्या त्रिपक्षीय बैठकीत एकमत झाले.१९६१ च्या ‘मॅटर्निटी बेनिफिट अ‍ॅक्ट’मध्ये सुधारणा करण्यासाठी तयार केलेल्या विधेयकावर चर्चा करण्यासाठी केंद्रीय श्रम मंत्रालयाने ही त्रिपक्षीय बैठक आयोजित केली होती. यात सरकार, केंद्रीय कामगार संघटना आणि मालकांचे प्रतिनिधी हजर होते.या कायद्यानुसार सध्या नोकरदार महिलांना प्रसूतीच्या अपेक्षित तारखेच्या आधी सहा आठवडे व प्रसूतीनंतर सहा आठवडे भरपगारी बाळंतपणाची रजा देण्याची तरतूद आहे. ही रजा वाढवून २६ आठवडे करण्याचे दुरुस्ती विधेयकात प्रस्तावित करण्यात आले आहे. रजेचा कालावधी वाढविण्यावर बैठकीत सर्व पक्षांचे एकमत झाले, असे सूत्रांनी सांगितले.मात्र ही रजा कोणाला द्यावी, यावर कामगार संधटना आणि सरकार यांच्यात एकवाक्यता दिसली नाही. ही बाळंतपणाची रजा केवळ स्वत: अपत्य जन्माला घालणाऱ्या नैसर्गिक मातांनाच न देता मूल दत्तक घेणाऱ्या मातांना आणि दुसऱ्या महिलेची कूस भाड्याने घेऊन तिच्याकरवी मूल जन्माला घालणाऱ्या मातांनाही २० आठवड्यांची बाळंतपणाची रजा मिळावी, असे कामगार संघटनांचे म्हणणे होते. परंतु नैसर्गिक मातेप्रमाणे मूल दत्तक घेणाऱ्या किंवा ‘सरोगेट मदर’ करवी मूल जन्माला घालणाऱ्या सिया नवजात अर्भकास स्तनपान करीत नसल्याने त्यांनाही ही वाढीव रजा देणे योग्य होईल का, यावर सरकारच्या वतीने साशंकता व्यक्त केली गेली, असे सेंटर फॉर ट्रेन युनियन काँग्रेसचे अध्यक्ष ए. के. पद्मनाभन यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)नोकरदार महिलांच्या सोयीसाठी कामाच्या ठिकाणी पाळणाघरांची सोय करण्यावरही या बैठकीत चर्चा झाली. नवजात अर्भकांच्या निकोप वाढीसाठी आणि मूल व आई यांच्यातील भावनिक बंध दृढ करण्यासाठी कामाच्या ठिकाणी अशी पाळणाघरे असण्याच्या गरजेवर सर्वांचेच एकमत झाले, असे भारतीय मजदूर संघाचे क्षेत्रिय संघटन सचिव बलदेव सिंग यांनी सांगितले.किमान ३० महिला अथवा एकूण ५० किंवा त्याहून जास्त कर्मचारी असलेल्या प्रत्येक कार्यालयास पाळणाघराची सोय करणे सक्तीचे करावे, यावरही बैठकीत सर्वसाधारण एकमत झाले. तसेच ज्या आया कामावर येताना आपल्या अपत्यास बरोबर आणतील व त्यांना पाळणाघरात ठेवतील त्यांना त्या अपत्याची काळजी घेण्यासाठी जेवणाच्या सुट्टीआधी व नंतर प्रत्येकी १५ मिनिटांची जादा रजा द्यावी, असेही ठरले.