शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

नातेवाईकांनी प्रेत पोलिस ठाण्यात आणले

By admin | Updated: June 23, 2016 16:55 IST

गत आठवड्यात वाळूज येथे अतिक्रमणाच्या वादातुन पेटवून घेतलेल्या एका ५० वर्षीय इसमाचा गुरुवारी उपचारादरम्यान शासकीय रुग्णालयात मृत्यु झाला

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. २३ -  गत आठवड्यात वाळूज येथे अतिक्रमणाच्या वादातुन पेटवून घेतलेल्या एका ५० वर्षीय इसमाचा  गुरुवारी उपचारादरम्यान शासकीय रुग्णालयात मृत्यु झाला आहे. यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी आरोपीविरुध्द कारवाई करण्यात यावी, यासाठी त्यांचा मृतदेह पोलिस ठाण्यात घेऊन आले होते. या प्रकरणी पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढत ७ आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात केला. त्यानंतर तणाव निवळला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १८ जून रोजी उत्तम बंडु भंडारी (५० रा.लायननगर, वाळूज) हे घराशेजारी शौचालयाचे बांधकाम करीत होते. दरम्यान, बांधकाम सुरु असतांना त्यांच्या घराशेजारील सुभाष सोनवणे, कुसुम सोनवणे, किशोर नाडे, आशाबाई चव्हाण, रेखा रोडे, उज्जवला डोंगरजाळ व कल्पना म्हस्के यांनी उत्तम भंडारी यांच्याशी वाद घालत बांधकाम थांबविण्यासाठी दबाव आणला होता. हा वाद सुरु असतांना उत्तम भंडारी यांनी शेजाºयांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. यावेळी भंडारी यांनी शेजाºयांना अगोदर सोनवणे या इसमाने अतिक्रमण करुन घर बांधले असून त्याचे अतिक्रमण काढा नंतर माझे अतिक्रमण काढतो असे सांगितले होते. शेजाºयांनी विनाकारण वाद उकरुन भांडण केल्यामुळे अपमानित झालेल्या उत्तम भंडारी यांनी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास राहत्या घरी पेटवून घेतले होते. त्यांचा आरडा-ओरडा ऐकून त्याची पत्नी ताराबाई व सुन नंदीनी भंडारे यांनी उत्तम भंडारी यांच्या कपडल्या लागलेली आग विझवुन त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेत उत्तम भंडारी हे ४० टक्के भाजले होते. शासकीय रुग्णालयात त्यांनी शेजाºयाबरोबर झालेल्या वादातुन आपण पेटवून घेतल्याचा जबाब दिला होता.
उपचारादरम्यान आज मृत्यू
शासकीय रुग्णालयात उत्तम भंडारी यांच्यावर उपचार सुरु असतांना आज गुरुवारी पहाटे ५.१५ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. यामुळे नातेवाईकांना चांगलाच धक्का बसला. दुर्दैवी घटनेत उत्तम भंडारी यांचा मृत्यु झाल्याची वार्ता वाळूजला पसरताच गावात तणावाचे वातावरण पसरले होते. या घटनेस जबाबदार असणाºया आरोपीविरुध्द कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा शव विच्छेदन होऊ देणार नाही, असा पवित्रा भंडारी यांच्या नातेवाईकांनी घेतला होता.
मृतदेह पोलिस ठाण्यात
शव विच्छेदन झाल्यानंतर उत्तम भंडारी याचा मृतदेह ठेवण्यात आलेली रुग्णवाहिका संतप्त नातेवाईकांनी वाळूज पोलिस ठाण्यात आणली होती.  यावेळी पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी मयताच्या नातेवाईकांची समजुत काढुन आरोपीविरुध्द कडक कारवाई करण्याचे तसेच तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यामुळे नातेवाईकांनी नरमाईची भुमिका स्विकारत त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घेऊन गेले. दुपारी ४ वाजेच्या सुमारास मयत उत्तम भंडारी यांच्यावर पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
 
चौघा आरोपींना अटक
 उत्तम भंडारी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांची पत्नी ताराबाई भंडारी यांच्या तक्रारीवरुन आरोपी सुभाष सोनवणे, कुसुम सोनवणे, किशोर नाडे, आशाबाई चव्हाण, रेखा रोडे, उज्जवला डोंगरजाळ व कल्पना म्हस्के यांच्याविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी  सुभाष सोनवणे, किशोर नाडे, रेखा रोडे, उज्जवला डोंगरजाळ या चौघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार उपेंद्र कुतुर हे करीत आहेत.