शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

ओबामांच्या दौऱ्याच्या खर्चाची माहिती देण्यास नकार

By admin | Updated: May 5, 2015 01:35 IST

भारत दौऱ्यावर आलेल्या अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांच्यासाठी केलेल्या खर्चाचा तपशील देण्यास नकार दिला आ

मुंबई : भारत दौऱ्यावर आलेल्या अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांच्यासाठी केलेल्या खर्चाचा तपशील देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे परराष्ट्र संबंधावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करीत या दौऱ्यावर केलेल्या खर्चाची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने नाकारली आहे.ओबामा हे पत्नी मिशेल व अधिकाऱ्यांच्या फौजफाट्यासह २५ ते २७ जानेवारीदरम्यान भारत भेटीवर आले होते. त्यानिमित्त दिल्लीमध्ये अभूतपूर्व सुरक्षाव्यवस्था राबविण्यात आली होती. त्यांच्या या पूर्ण दौऱ्यावर किती खर्च करण्यात आला, पाहुण्यांच्या निवासस्थान व प्रवासासाठी किती मनुष्यबळ वापरण्यात आले आणि त्यासाठी आलेल्या खर्चाची सविस्तर माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मागविली होती. त्याबाबत परराष्ट्र मंत्रालयातील उप मुख्य प्रोटोकॉल अधिकारी रोहित रथिश यांनी कळविले, की प्रत्येकवर्षी सरकार अनेक परदेशी गणमान्य व्यक्ती ज्या भारतात येतात त्यांचे आदरातिथ्य करीत असते. हे दौरे प्रतिनिधिमंडळाचे स्वरूप, प्रयोजन, वर्गीकरण, संघटन, पाहुणचार कसा केला आणि कोणकोणत्या शहरांचा दौरा केला गेला, या दृष्टिकोनातून वेगवेगळे नियोजन केलेले असते. ही बाब संवेदनशील असून, ती उघड झाल्यास त्याचा प्रतिकूल परिणाम देशाच्या परराष्ट्र संबंधांवर होऊ शकतो, अशी माहिती देण्यात आलेली आहे. (प्रतिनिधी)