दहशतवाद्यांनी केली अनेक शहरांत रेकी; ते दोघेही ‘अल सफा’शी मागील चार वर्षांपासून संपर्कात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 10:24 AM2023-07-31T10:24:20+5:302023-07-31T10:25:25+5:30

त्यांच्या लॅपटाॅप, मोबाइलमध्ये तब्बल ५०० जीबी डेटा आढळल्याचे राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

Reiki in several cities by terrorists Both of them have been in touch with 'Al Safa' for the past four years | दहशतवाद्यांनी केली अनेक शहरांत रेकी; ते दोघेही ‘अल सफा’शी मागील चार वर्षांपासून संपर्कात

दहशतवाद्यांनी केली अनेक शहरांत रेकी; ते दोघेही ‘अल सफा’शी मागील चार वर्षांपासून संपर्कात

googlenewsNext

पुणे : पुणे शहर पोलिसांनी पकडलेल्या २ दहशतवाद्यांनी राज्यातील अनेक शहरांत रेकी केली होती. ते हॉटेलमध्ये मुक्काम करण्याऐवजी तंबूत राहत असत. त्यांच्या लॅपटाॅप, मोबाइलमध्ये तब्बल ५०० जीबी डेटा आढळल्याचे राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणात एटीएसने आतापर्यंत दोन दहशतवादी व त्यांना सहकार्य करणारे दोघे अशा चौघांना अटक केली आहे. मोहम्मद इम्रान युनूस खान आणि युनूस याकूब साकी (दोघे मूळ रा. रतलाम, मध्य प्रदेश) या एनआयएच्या दोन फरार दहशवाद्यांचा यात समावेश आहे. त्यांचा तिसरा साथीदार फरार आहे. त्याच्या शोधासाठी अनेक पथके कार्यरत आहेत.

हे दोघे दीड वर्षांपासून पुण्यात वास्तव करून होते. आपण ग्राफिक डिझायनर असल्याचे सांगत असले तरी त्यांचे शिक्षण १२ वीपर्यंतही झाले नसल्याचे एटीएस अधिकारी म्हणाले. या दोघांकडे ड्रोन सापडले असून त्याच्या सहाय्याने त्यांनी अनेक ठिकाणचे चित्रिकरण केले आहे. ते नेमके कोणत्या ठिकाणचे आहे, त्याचा फॉरेन्सिंग तज्ज्ञ शोध घेत आहेत.

‘अल सफा’च्या संपर्कात
दोघेही पूर्णपणे ब्रेनवॉश केलेले कट्टर दहशतवादी असून त्यांच्याकडे आढळलेली कागदपत्रे व अन्य साहित्यावरून ते अल सफा या दहशतवादी संघटनेशी ३ ते ४ वर्षांपासून संपर्कात असल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या लॅपटॉपमध्ये जिहादी असे व्हिडीओ, पुस्तके, वैयक्तिक यूट्युबवरील भाषणे, पीडीएफ कागदपत्रे आढळली.

लॅपटॉपमध्ये ५०० जीबी डेटा
लॅपटॉपची क्षमता ही साधारण ५०० जीबी इतकी असते. त्यांच्याकडील २ लॅपटॉप व मोबाइलमध्ये ५०० चित्रपटांइतका डेटा अशा प्रकारच्या वादग्रस्त व्हिडीओ, पुस्तके व इतर साहित्यांनी भरलेला आहे.

तंबूत मुक्काम
हे दोघे राज्यातील व पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी फिरले आहेत. त्या काळात त्यांनी एकदाच हॉटेलमध्ये राहण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ते नाव बदलून राहिले होते. अन्य वेळी कोठेही गेले तरी ते तंबू बरोबर घेऊन जात व त्यात मुक्काम करीत. त्यामुळे ते कधीही रडारवर आले नसल्याचे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या दहशतवाद्यांना मदत करणारे अनेक जण असून त्यांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यांच्याविषयी ठोस पुरावा एसटीएस गोळा करीत आहेत.

पुण्यातील ज्यूंचे प्रार्थनास्थळ पडले बंद
पुणे : इस्रायली, तसेच अमेरिकन ज्यूंचे पुण्यातील प्रार्थनास्थळ अर्थात खब्बात हाउस येथील धर्मगुरू इस्रायलला स्थलांतरित झाल्याने आता बंद करण्यात आले आहे. ते गेली कित्येक वर्षे दहशतवाद्यांच्या टार्गेटवर होते. कोरेगाव पार्कमधील ओशो आश्रमात येणाऱ्या ज्यू धर्मीयांसाठी सन १९९२ मध्ये हे प्रार्थनास्थळ सुरू केले होते. धर्मगुरूंनीच स्थलांतर केल्याने आता हे प्रार्थनास्थळ उघडेल की नाही, याबाबत साशंकता आहे.

Web Title: Reiki in several cities by terrorists Both of them have been in touch with 'Al Safa' for the past four years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.