शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात १४८ उच्च माध्यमिक आश्रमशाळांमधील १५०० कर्मचाऱ्यांना मिळणार नियमित वेतन

By admin | Updated: October 28, 2016 22:00 IST

आश्रमशाळेतील शिक्षकांना नियमित वेतन अदा करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठाचे न्या. भूषण आर. गवई आणि न्या. व्ही.एम. देशपांडे यांनी शासनास दिला.

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 28 - याचिकाकर्त्यांसह राज्यातील इतर उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील शिक्षकांना नियमित वेतन अदा करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठाचे न्या. भूषण आर. गवई आणि न्या. व्ही.एम. देशपांडे यांनी शासनास दिला. या सर्व कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेस त्यांच्या बँकेतील खात्यावर जमा करावे. तसेच थकित वेतनाची रक्कम ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत अदा करावी, असेही आदेशात म्हटले आहे. खंडपीठाने आदेश देताच शासनाने २५ आॅक्टोबर २०१६ रोजी वरीलप्रमाणे नियमीत वेतन अदा करण्याचा शासन निर्णय घेतला व त्याची प्रत खंडपीठात सादर केली. या आदेशामुळे राज्यातील १४८ उच्च माध्यमिक आश्रम शाळेतील (कनिष्ठ महाविद्यालय) १५०० कर्मचाऱ्यांना नियमीत वेतन अदा होणार आहे. राज्यातील १४८ उच्च माध्यमिक आश्रम शाळांना शासनाने २६ जुन २००८ आणि ३१ आॅगस्ट २००९ रोजी अनुदान तत्वावर मान्यता दिली होती. या सर्व उच्च माध्यमिक शाळांमधील १४५९ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २०१४ पासून ५० टक्के वेतन अनुदान व त्या पुूढील वर्षापासून १०० टक्के वेतन अनुदान देण्याचा शासनाने निर्णय घेतला होता. तरीही शासनाने त्यांना नियमीत वेतन अदा केले नव्हते. या सर्व कर्मचाऱ्यांनी औरंगाबाद आणि नागपुर खंडपीठात स्वतंत्र याचिका दाखल केल्या होत्या. त्या अनुषंगाने खंडपीठाने अनुक्रमे १३ एप्रिल २०१६ आणि २८ एप्रिल २०१६ रोजीच्या आदेशान्वये याचिकाकर्त्या कर्मचाऱ्यांना नियमीत वेतन अदा करण्याचे अंतरीम आदेश दिले होते. मात्र, शासनाने या आदोशची अंमलबजावणी केली नाही. म्हणुन ३० कनिष्ठ महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी अ‍ॅड. एन.पी. पाटील जमालपुरकर यांच्यामार्फत नागपुर खंडपीठात अवमान याचिका दाखल केल्या होत्या. त्यावर शासनाने २६ आॅक्टोबर २०१६ पर्यंत उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करुन याचिकाकर्त्या कर्मचाऱ्यांना नियमीत वेतन अदा करण्याचा निर्णय घ्यावा,अन्यथा शासनाचे मुख्य सचिव, वित्त विभागाचे मुख्य सचिव आणि समाज कल्याण विभागाचे मुख्य सचिव यांनी व्यक्तीश: खंडपीठात हजर राहुन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई का करु नये, याचे स्पष्टीकरण द्यावे, असे आदेश दिले होते. या आदेशाचे गांभीर्य लक्षात घेवून प्रधान सचिवांनी याचिकाकर्त्यांसह राज्यातील इतर उच्च माध्यमिक आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांना नियमीत वेतन अदा करण्याचा शासन निर्णय २५ आॅक्टोबर २०१६ रोजी जारी केला. त्याची प्रत २६ आॅक्टोबर २०१६ रोजी खंडपीठात सादर केली.