शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पुणे, साताऱ्याला रेड, नाशिक, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2024 09:37 IST

गेल्या काही दिवसांपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर अनेक भागांत जोरदार पाऊस होत आहे.

पुणे : हवामान विभागाने पुढील ४ दिवस राज्यातील अनेक भागांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.  घाटमाथ्यावर रेड अलर्ट आहे.

    गेल्या काही दिवसांपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर अनेक भागांत जोरदार पाऊस होत आहे. शनिवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती.  पुढील चार दिवस विदर्भ, मराठवाड्यातील काही भागांतही जोरदार पावसाची शक्यता आहे. सातारा, पुणे जिल्ह्यांत अनेक ठिकाणी अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे.

या जिल्ह्यांना अलर्ट -रेड अलर्ट - पुणे, सातारा घाट माथा ऑरेंज अलर्ट - विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, नागपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांतील काही भागात ऑरेंज अलर्ट आहे.यलो अलर्ट : कोल्हापूर, नाशिक, नगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. 

कोल्हापुरात पूरस्थिती ‘जैसे थे’कोल्हापूर : काेल्हापूर जिल्ह्यात शनिवारी पावसाने उसंत घेतली असली तरी पूरस्थिती कायम आहे. धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस झाल्याने विसर्ग कायम आहे. राधानगरीतून प्रतिसेकंद ५७८४ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पंचगंगेची पातळी ४२.१ फूट असून अद्याप ७४ बंधारे पाण्याखाली असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.

दरड कोसळली, रेल्वे वाहतूक विस्कळीतकसारा : सततच्या पावसामुळे शनिवारी नाशिक-कल्याण मार्गावरील कसारा घाटात टी.जी.आर.३ या बोगद्याजवळ सकाळी रेल्वे रुळावर दरडी कोसळल्याने मुंबईकडे जाणाऱ्या व येणाऱ्या मेल, एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले. - परिणामी अपलाईनने जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक मिडल लाईनने वळवून रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यात आली. - सकाळी राज्यराणी एक्स्प्रेस इगतपुरी रेल्वे स्थानकात असतानाच दरड कोसळल्याने पुढील अनर्थ टळला. उंबरमाळीजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने रेल्वेसेवा ठप्प झाली होती.  

प्रकल्प ओव्हरफ्लो, सतर्कतेचा इशारागोंदिया : जुलै महिन्यात सलग १२ दिवस आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाचा जोर कायम असल्याने जिल्ह्यातील चार मध्यम आणि सात लघू प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. धरणाची पाणीपातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी शनिवारी सकाळी पुजारीटोला धरणाचे १० दरवाजे उघडण्यात आले.  

सातारा : वीर धरणातूनही विसर्ग वाढविल्याने नीरा नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. परिणामी खंडाळा तालुक्यात लाेणंदजवळचा नीरा जुना पूल आणि वाठार-वीर रस्त्यावरील वाहतूक बंद केली. २४ तासांत महाबळेश्वरला ९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

वारणा नदीकाठी पूरस्थिती कायमसांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये  पावसाचा जोर असल्याने वारणा धरणातून विसर्ग कायम आहे.त्यामुळे वारणा नदीकाठी पूरस्थिती अजूनही कायम आहे.

टॅग्स :RainपाऊसNashikनाशिकPuneपुणेVidarbhaविदर्भ