शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कामगार संघटनेची मान्यता रद्द, हायकाेर्टात जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2022 07:20 IST

इंटकने महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या विरोधात केलेली तक्रार एमआरटीयू ॲण्ड पीयूएलपी कायद्यांतर्गत मंजूर करण्यात आली आहे. त्याशिवाय कामगार संघटनेची मान्यता रद्द करून न्यायालयाने प्रकरण निकाली काढले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  एसटी महामंडळातील मान्यताप्राप्त महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेची मान्यता औद्योगिक न्यायालयाने रद्द केली आहे. कर्मचाऱ्यांचे नुकसान करून केवळ संघटनेच्या फायद्याचे निर्णय घेणे, विविध कलमांचे उल्लंघन करण्याचा ठपका ठेवत न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. याबाबत महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसने (इंटक) मुंबई औद्योगिक न्यायालयात मे, २०१२ साली याचिका दाखल करण्यात होती, अशी माहिती इंटक संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

तिगोटे म्हणाले की, इंटकने महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या विरोधात केलेली तक्रार एमआरटीयू ॲण्ड पीयूएलपी कायद्यांतर्गत मंजूर करण्यात आली आहे. त्याशिवाय कामगार संघटनेची मान्यता रद्द करून न्यायालयाने प्रकरण निकाली काढले आहे. इंटकच्या वतीने न्यायालयात दहा प्रमुख मुद्दे मांडण्यात आले. १९९६ पासून झालेल्या वेतन करारात योग्य वेतनवाढ करण्यात आली नाही. २००० पासून कनिष्ठ वेतन श्रेणीच्या नावाखाली निम्म्या पगारात ३५ हजार कामगारांची पाच वर्षे पिळवणूक केली. सन २००० ते २००८ या दोन वेतन करारात बेसिकमध्ये एक रुपयाही वाढवला नाही तर केवळ ३५० रुपये व्यक्तिगत भत्ता म्हणून दिला. करार संपल्यानंतर ३५० रुपये काढून घेण्यात आले. 

सन १९९५ पासून विविध भत्त्यात वाढ न करता सन २००८-२०१२ च्या वेतन करारात कपात करण्यात आली. तसेच किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळवून देण्याची कायदेशीर जबाबदारी असताना वेतन मिळवून दिले नाही. तसेच देशात सर्वात कमी पगार महाराष्ट्रातील एसटी कामगारांना असूनही मान्यताप्राप्त संघटना कायदेशीर जबाबदारी असताना कधीही कायदेशीररीत्या न्यायालय अथवा तीव्र आंदोलनात्मक भूमिका घेतली नाही. प्रचंड आर्थिक नुकसान झाल्याने कामगारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून, आज संपाची परिस्थिती निर्माण झाली आहे, असे इंटककडून मांडण्यात आले.

औद्योगिक न्यायालयाने एसटी कामगार संघटनेची मान्यता रद्द करण्याचा निकाल दिला आहे. मात्र त्याची प्रत सोमवारी मिळणार आहे. याविरोधात आम्ही उच्च न्यायालयात दाद मागू, निश्चित आम्हाला न्याय मिळेल.- संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना

३८६४ कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस 

एसटी महामंडळाने निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे.  महामंडळाने शनिवारी १८५ निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले असून बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या १९२६ वर पोहोचली. तर आतापर्यंत महामंडळाने  

११,०२४ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. एसटी  महामंडळाने आतापर्यंत ११,०२४  कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. याशिवाय २७९६ कर्मचाऱ्यांचा बदल्या केल्या आहे. तर महामंडळाने आतापर्यंत ३८६४ कर्मचाऱ्यांना बडतर्फीची ‘कारणे दाखवा’ नाेटीस बजावली आहे.

टॅग्स :state transportएसटी