शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

विद्यापीठातील शिक्षक पदभरतीस मान्यता : उच्च शिक्षण विभागाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2019 1:26 PM

पुढील सहा महिन्यांच्या आत रिक्त पदांची भरती प्रक्रिया पूर्ण करावी...

ठळक मुद्देविद्यापीठांमधील ६५९ पदे भरता येणार

पुणे : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित विचारात घेऊन राज्यातील अकृषी विद्यापीठातील रिक्त असलेल्या शिक्षकीय व शिक्षक समकक्ष पदे भरण्यास राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे राज्यातील १५ विद्यापीठांमधील ६५९ शिक्षकांच्या रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे मुंबई विद्यापीठातील सर्वाधिक १३६ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील १११ पदे भरली जाणार आहेत.राज्याच्या वित्त विभागाने आकृतीबंध अंतिम मंजूर होईपर्यंत नवीन पदनिर्मितीस तसेच पदभरती करण्यास निर्बंध घातले होते. मात्र, २०१७ पासून नवीन पदभरतीवर निर्बंध असल्याने या काळात सेवानिवृत्ती व इतर कारणास्तव रिक्त झालेली पदे भरता आली नाहीत. त्यामुळे राज्य शासनाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित विचारात घेवून १५ अकृषी व अभिमत विद्यापीठांसाठी मंजूर पदांच्या ८० टक्के इतक्या मर्यादेत पदभरती करण्यास मान्यता दिली आहे. 

विद्यापीठांनी रिक्त पदांची भरती करताना ज्या शैक्षणिक विभागातील पदे भरण्याची आवश्यकता आहे, त्याच शैक्षणिक विभागांची पदे भरण्यास प्राधान्य द्यावे. विद्यापीठांनी जास्तीत जास्त सहायक प्राध्यापकांची पदे भरावीत. तसेच पुढील सहा महिन्यांच्या आत रिक्त पदांची भरती प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण विभागाने अध्यादेश प्रसिद्ध करून दिले आहेत.........पदभरती करण्यास मान्यता मिळालेल्या पदांची विद्यापीठनिहाय संख्यामुंबई विद्यापीठ - १३६, एसएनडीटी महाविद्यापीठ, मुंबई- ७८, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक - १२, राष्ट्रसंत तुकडोजीमहाराज नागपूर विद्यापीठ - ९२, गोंडवाना विद्यापीठ ,गडचिरोली -११,  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ-०७ , शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर ७२, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ -१११, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद -७३, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव -०६, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड-२१, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती-१३, डेक्कन अभिमत विद्यापीठ, पुणे- १४, टिळक महाराष्ट्र अभिमत विद्यापीठ, पुणे-०५, गोखले अभिमत विद्यापीठ, पुणे ०८.

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठEducationशिक्षणState Governmentराज्य सरकार