शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

खासगी जमीन खरेदीला मान्यता

By admin | Updated: May 14, 2015 01:54 IST

केंद्र सरकारचा नवीन भूसंपादन कायद्याचे भवितव्य अधांतरी असताना महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांकरिता लागणारी खासगी जमीन वाटाघा

मुंबई : केंद्र सरकारचा नवीन भूसंपादन कायद्याचे भवितव्य अधांतरी असताना महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांकरिता लागणारी खासगी जमीन वाटाघाटी करून थेट खरेदी करण्याबाबतचे आदेश राज्याच्या महसूल व वन विभागाने मंगळवारी जारी केले आहेत. या नव्या आदेशानुसार ग्रामीण भागात रेडीरेकनरच्या दराच्या पाचपट तर शहरी भागात रेडीरेकनरच्या दराच्या अडीचपट मोबदला दिला जाईल, अशी माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी ‘लोकमत'ला दिली. थेट जमीन खरेदीत मोबदल्याचे दर निश्चित करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समित्या स्थापन करण्यात येणार आहेत.खडसे म्हणाले की, सरकारच्या कुठल्याही प्रकल्पात भूसंपादनामुळे अडथळे उभे राहतात; त्यामुळे जमीन संपादन होईल व प्रकल्पाचा खर्च कमी होईल, या हेतूने हे आदेश काढले आहेत. थेट वाटाघाटीद्वारे दिलेले दर मान्य केल्यानंतर ज्यांची जमीन संपादित केली जाणार आहे त्यांना न्यायालयात जाता येणार नाही आणि जमिनीचा मोबदला देताच जमीन सरकारच्या ताब्यात येईल, अशी अट टाकण्यात येणार असल्याचेही खडसे यांनी स्पष्ट केले.शासनाच्या नवीन भूसंपादन कायद्यान्वये मिळणारा मोबदला, त्यापूर्वी राज्य शासनामार्फत मिळणारा मोबदला तसेच शेतकऱ्यांकडून थेट वाटाघाटींद्वारे जमीन खरेदी करताना मिळणारा मोबदला यामध्ये तफावत असल्याने शेतकरी जमीन देण्याबाबत संभ्रमात असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली होती. त्यामुळे अपर मुख्य सचिव (वित्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करून थेट वाटाघाटींद्वारे जमीन संपादित करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात आली. (विशेष प्रतिनिधी)