शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
2
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
3
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
4
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
5
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
6
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
7
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
8
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
9
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
10
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
11
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
12
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
13
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
14
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
15
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
16
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
17
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
18
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
19
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
20
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
Daily Top 2Weekly Top 5

स्मृतिदिनासाठी यंत्रणा सज्ज

By admin | Updated: November 17, 2014 04:30 IST

१७ नोव्हेंबर रोजी शिवतीर्थावर स्मृतिस्थळाच्या दर्शनासाठी देशभरातून मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि सामान्य जनता येण्याची शक्यता आहे.

मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त उद्या, १७ नोव्हेंबर रोजी शिवतीर्थावर स्मृतिस्थळाच्या दर्शनासाठी देशभरातून मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि सामान्य जनता येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका, पोलीस तसेच शिवसैनिकांची व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झाली आहे. सकाळी ७ वाजल्यापासून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाच्या दर्शनास प्रारंभ होईल. वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी काही बदल करण्यात आले आहेत. वाहने उभी करण्यास परवानगी असलेले रस्ते : संपूर्ण सेनापती बापट मार्ग, माहीम ते दादर, पाच उद्यान परिसर माटुंगा, लखमशी नप्पू रोड. वाहनांना प्रवेश बंदी असलेले मार्ग : स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, राजाबढे चौक जंक्शन ते केळस्कर मार्ग उत्तर जंक्शनपर्यंत, दिलीप गुप्ते मार्ग, पांडुरंग नाईक मार्ग जंक्शन येथून दक्षिण वाहिनी, गडकरी चौक येथून केळुस्कर रोड दक्षिण व उत्तर, दादासाहेब रेगे मार्ग, सेनापती बापट पुतळा येथून गडकरी जंक्शनपर्यंत, बाळ गोविंददास मार्ग, पद्याबाई ठक्कर मार्ग जंक्शन सेनापती बापट मार्गापासून पश्चिम दिशेला लेडी जमशेटजी मार्गापर्यंत. वाहने उभी करण्यास प्रतिबंध असलेले रस्ते : एस. व्ही. एस. रोड, केळुस्कर रोड दक्षिण व उत्तर, एम. बी. राऊत मार्ग, पांडुरंग नाईक मार्ग, दादासाहेब रेगे, दिलीप गुप्ते मार्ग, एन. सी. केळकर मार्ग.शिवसेना नेते, उपनेते, खासदार, आमदार, जिल्हा संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, महापौर, उपमहापौर व मान्यवर व्यक्तींसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरील संयुक्त महाराष्ट्र दालनासमोरील शिवपुतळ््याशेजारील प्रवेशद्वारातून स्मृतिस्थळापर्यंत जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवसैनिकांसाठी व इतर सर्वांसाठी समर्थ व्यायाम मंदिराकडून दर्शनरांगेतून प्रवेश दिला जाईल.दर्शनरांगेतून येऊन स्मृती चौथऱ्यावर पुष्पांजली वाहण्याची व्यवस्था केली आहे. महानगरपालिकेच्या वतीने पाच ठिकाणी पाणपोईची व्यवस्था तसेच शिवाजी पार्क परिसरात शौचालये उभी केली असून, कबड्डी असोसिएशनच्या शेजारी तात्पुरत्या प्राथमिक आरोग्य केंद्राची आणि रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)