शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : अंतर्गत विरोधामुळे जाधव यांना ग्रहण?

By admin | Updated: October 6, 2014 22:36 IST

विधानसभा निवडणूक : अंतर्गत हालचालींमुळे धक्कादायक निकाल ?

रत्नागिरी : कोकणचे नेतेपद मिळवण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणारे गुहागर विधानसभा मतदार संघातील उमेदवार भास्कर जाधव यांचे पक्षातील प्रमुख प्रतिस्पर्धी उदय सामंत शिवसेनेत गेले असले तरीही उर्वरित अंतर्गत विरोधामुळे भास्कर जाधव यांना ही निवडणूक अवघड होणार आहे. वरकरणी शिवसेना - भाजपची मते फुटलेली दिसत असली तरी अंतर्गत पातळीवर होत असलेल्या हालचालींमुळे भास्कर जाधव यांचा मार्ग कठीण झाला असल्याचे चित्र दिसत आहे.१९९५ आणि ९९ साली शिवसेनेकडून आमदार झालेल्या भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या वादामुळे २00४मध्ये शिवसेना सोडली आणि अपक्ष निवडणूक लढवली. त्यात त्यांना अल्प मतांनी पराभूत व्हावे लागले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचा मार्ग धरला. आधी ते विधानपरिषद सदस्य झाले. त्यानंतर २00९च्या निवडणुकीत पक्षाने त्यांना गुहागरची उमेदवारी दिली. शिवसेना-भाजपच्या भांडणात जाधव यांचा फायदा झाला.राष्ट्रवादीकडून प्रथमच विधानसभेत जाताना त्यांना रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळाले. तेथूनच वादाची खरी ठिणगी पडली. चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांच्याशी त्यांचे आधीपासूनच वाद होते. मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांचे आणि उदय सामंत यांचे जोरदार शीतयुद्ध सुरू झाले.कोकणचे नेते बनण्याची महत्त्वाकांक्षा असल्याने मोठे होण्याच्या वेगात त्यांनी अनेक शत्रू निर्माण केले. उदय सामंत यांच्यापाठोपाठ सुनील तटकरे यांच्याशीही त्यांचे वाद सुरू झाले.भास्कर जाधव यांचे मंत्रिपद काढून उदय सामंत यांना देण्यात आल्यानंतरही वाद कायम होते. जाधव यांना त्याचवेळी प्रदेशाध्यक्षपद देण्यात आले. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर जाधव यांनी त्यांच्याशी जवळीक नसलेले काही पदाधिकारी बदलले.जाधव यांनी केवळ नेतेच नाही तर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दुखावले आहे. शिवसेनेत असताना कौतुकास्पद ठरलेल्या त्यांच्या आक्रमकपणामुळे राष्ट्रवादीत मात्र त्यांना अनेक शत्रू निर्माण करून दिले.आताच्या घडीला त्यांनी अंतर्गत शत्रू अनेक निर्माण केले आहेत. राष्ट्रवादीचे जे-जे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते दुखावले गेले आहेत, त्यांची एक फळी जाधव यांच्याविरोधात कार्यरत आहे.एकीकडे आपल्या पक्षातल्या लोकांना दुखावतानाच जाधव यांनी इतर पक्षातही मोठे शत्रू निर्माण केले आहेत. नारायण राणे यांच्यावर सातत्याने टीका करण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे स्वत: राणे आणि माजी खासदार नीलेश राणे दुखावले गेले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत जाधव यांना राणे यांच्याशीही टक्कर द्यावी लागणार आहे. काँग्रेस उमेदवारावरून आणि राणे यांच्यावरून जाधव यांनी आतापर्यंत अनेकदा वादग्रस्त विधाने केली आहेत. त्या साऱ्याचा परिणाम या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे.युतीची मते फुटल्याने गतवेळी जाधव विजयी झाले. याहीवेळी युती तुटलेली आहे. पण, तरीही युतीच्या कार्यकर्त्यांमधील अंतर्गत हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे जाधव यांच्या मार्गावर काटेच काटे पसरले गेले आहेत, असे सध्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)जाधव यांच्याविरोधात इतरांची एकी?अन्य पक्षांतील नेत्यांप्रमाणे स्वपक्षातील शत्रूंचे प्रमाणही मोठेच.मोठे होण्याच्या वेगामुळे अनेकजण दुखावले गेले.गुहागरमधील शिवसेना-भाजपमध्ये अंतर्गत हालचाली वाढल्या?जाधव यांच्याविरोधात अनेकजण एकवटल्याची चर्चा.