शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
6
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
7
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
8
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
9
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
10
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
11
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
12
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
13
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
14
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
15
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
16
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
17
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
18
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
19
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
20
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

सेनेच्या बालेकिल्ल्यात राणे लढणार!

By admin | Updated: March 12, 2015 05:14 IST

वांद्रे पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यापुढे उमेदवारीचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र याबाबत आपला निर्णय २३ तारखेला

अतुल कुलकर्णी, मुंबईवांद्रे पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यापुढे उमेदवारीचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र याबाबत आपला निर्णय २३ तारखेला जाहीर करु, असे राणे यांनी स्पष्ट केले आहे. वांद्रे पूर्व चे शिवसेनेचे आमदार प्रकाश उर्फ बाळा सावंत यांचे निधन झाल्यामुळे त्या जागेसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राणे यांना माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि पक्षाचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी राणे यांना हा प्रस्ताव दिला होता. मात्र मधल्या काळात प्रदेशाध्यक्षपदी खा. अशोक चव्हाण यांची निवड झाली. त्यावर राणे यांनी त्यांची नाराजी जाहीरपणे व्यक्त केलेली नसली तरी ती त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. आपण परदेशातून आल्यानंतर आपली भूमिका जाहीर करु असे राणे म्हणाले होते. वांद्रे पूर्व मधून आपण निवडून येऊ शकता, असे राणे यांच्या समर्थकांना वाटते. या मतदारसंघात दीड लाख मुस्लिम मतदार आहेत. याच ठिकाणी एमआयएमने २३ हजार मते मिळवली होती. भाजपा आणि राष्ट्रवादी आपला उमेदवार उभा करण्याच्या मनस्थितीत नाही, शिवाय शिवसेनेचे तीन चार गट त्या मतदारसंघात आहेत. शिवसेनेने कोणाला उमेदवारी द्यावी याविषयी त्यांच्यात मतमतांतरे आहेत. अशा स्थीतीत जर सगळ्यांनी साथ दिली तर राणे निवडून येऊ शकतात असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. मात्र जर राणे मैदानात उतरले तर मात्र शिवसेना त्वेषाने लढेल, त्यात जर राणेंचा पराभव झाला तर तो आपल्या राजकीय कारकिर्दीला मागे नेणारा असेल.याबाबत प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मी दिल्लीत आहे. उद्या मुंबईला येईन. पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करेन. त्यानंतर सार्वमताने निर्णय घेतला जाईल.