उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला असतानाच, केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी या दुर्घटनेबाबत प्राथमिक तांत्रिक माहिती दिली आहे. "महाराष्ट्रासाठी हा खूप मोठा लॉस आहे, असा नेता मिळणे कठीण आहे," अशा शब्दांत श्रद्धांजली अर्पण करत त्यांनी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिल्याचे सांगितले.
अजितदादा, असे अचानक निघून जाणे बरोबर नाही..!
वैमानिकाने रनवे दिसत असल्याचे सांगितल्यानंतर अजित पवार प्रवास करत असलेल्या विमानाला उतरण्याची परवानगी देण्यात आली होती, असे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवरून विमान नादुरुस्त होते का यावरून चर्चा होत असताना केंद्रीय मंत्र्यांनी मोठी माहिती दिली आहे.
मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामतीमध्ये लँडिंग करताना 'व्हिजिबिलिटी' (दृश्यमानता) अत्यंत कमी होती. विमान आणि एटीसी (ATC) दरम्यान झालेला संवाद झाला. पहिल्या प्रयत्नावेळी विमानाचा एटीसी बारामतीशी संपर्क झाला. एटीसीने विचारले, "तुम्हाला रनवे दिसतोय का?" वैमानिकाने "नाही" असे उत्तर दिले. त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून वैमानिकाने 'गो अराऊंड' (विमान पुन्हा हवेत नेणे) केले. दुसऱ्या प्रयत्नासाठी आले असता बारामती एटीसीने पुन्हा विचारले, "आता रनवे दिसतोय का?" यावर सुरुवातीला वैमानिकाने समाधानकारक नसल्याचे सांगितले. पण काही क्षणातच "रनवे दिसत आहे" असे एटीसीला कळवले. त्यानंतर त्यांना धावपट्टीवर उतरण्याची परवानगी देण्यात आली, असे नायडू यांनी सांगितले.
Web Summary : Visibility issues led to a near-accident involving Ajit Pawar's flight. Despite initial uncertainty, the pilot confirmed runway visibility, and landing was permitted. An investigation is underway.
Web Summary : अजित पवार के विमान के साथ दृश्यता समस्या के कारण दुर्घटना होते होते बची। शुरुआती अनिश्चितता के बावजूद, पायलट ने रनवे की दृश्यता की पुष्टि की, और लैंडिंग की अनुमति दी गई। जांच चल रही है।