शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

राळेगणसिद्धी ८० टक्के ‘स्मार्ट’

By admin | Updated: January 1, 2017 03:08 IST

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी हे गाव आदर्श ग्राम म्हणून ओळखले जाते. चाराबंदी, दारूबंदी, हुंडाबंदी यांसारख्या सामाजिक

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी हे गाव आदर्श ग्राम म्हणून ओळखले जाते. चाराबंदी, दारूबंदी, हुंडाबंदी यांसारख्या सामाजिक उपक्रमांमुळे या गावाचा लौकीक सर्वदूर झाला आहे. तसे पाहिले तर हे गाव प्रगतीशील आहे. पंचक्रोशीतील पहिला फोन याच गावात आल्याने हे गाव तसे ‘कनेक्ट’ आहे. आता तर प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन आल्यामुळे आणि गावात इंटरनेटही पोहोचल्याने अण्णांचे राळेगणसिद्धी बरेचसे ‘स्मार्ट’ही बनले आहे. मात्र अद्याप पूर्णपणे ‘डिजिटल’ झालेले नाही. लहान मोठे व्यवहार अजुनही रोखीनेच होताना दिसत आहेत.राळेगणसिद्धीता. पारनेर जि. अहमदनगरजिल्ह्यापासून अंतर : ५५ किमीलोकसंख्या : ३००० हजार महाराष्ट्र बँक शाखा : एकसहकारी बँक : नाहीपतसंस्था : एक एटीएम : एकपारनेर बसस्थानकातून राळेगणसिद्धी बस आहेत. गावात अंदाजे आठशे ते नऊशे स्मार्ट फोन साक्षरतेचे प्रमाण ९६ टक्केसगळीकडे कॅशलेस आर्थिक व्यवहार सुरू झाल्यावर अनेक ठिकाणी भ्रष्टाचाराच्या प्रकारांना आळा बसेल. लोकांनीही आता डिजिटल माध्यामांचा वापर करून कॅशलेस व्यवहारांवर अधिक भर दिला पाहिजे. - अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवकअद्याप सामान्य लोकांना डिजिटल व्यवहारांचे तंत्र अवगत झालेले नाही. परंतु मोबाइल वापरतात त्यांना डिजिटलचा सर्वाधिक फायदा होईल. खिशात रोख रक्कम नसली तरी फक्त डेबिट कार्ड असले तरी व्यवहार करू शकेल.- दादा पठारे, उपाध्यक्ष, आदर्श पतसंस्थाकॅशलेस व्यवहारांमुळे सर्वांत महत्त्वाचे म्हणजे लोकांचा पैसे काढण्यासाठी व भरणा किंवा इतर व्यवहारांसाठी दुसऱ्या गावांना जाण्याचा वेळ वाचेल. आर्थिक उलाढाल यंत्रणा प्रगत होईल. जुन्या लोकांना याचा थोडा त्रास होईल, पण नव्या पिढीसाठी हा निर्णय चांगला आहे.- मंगल मापारी, सरपंच कॅशलेस व्यवहारांमुळे चोरीचे प्रमाण कमी होईल. सामान्य माणूस बँकिंग प्रक्रियेत येऊन बँकिंग व्यवहारात सज्ञान होईल हा सर्वात मोठा फायदा आहे.- भागवत पठारे, उद्योजकपारनेरसारख्या ग्रामीण भागातही दोन हजारांच्या बनावट नोटा काहींनी तयार केल्या होत्या. या नोटांचा फटका सामान्य व्यापाऱ्यांनाच बसत होता. आता कॅशलेस व्यवहारांमुळे सामान्य लोकांची फसवणूक थांबणार आहे.- संजय पठाडे, शिक्षक