राकेश मारिया यांच्या चौकशीचे आदेश

By Admin | Updated: July 17, 2014 02:35 IST2014-07-17T02:35:30+5:302014-07-17T02:35:30+5:30

विनिता कामटे यांना दिशाभूल करणारी माहिती दिल्याप्रकरणी मुंबई पोलीस दलाचे प्रमुख राकेश मारिया यांच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी दिले आहेत.

Rakeysh Maria's inquiry order | राकेश मारिया यांच्या चौकशीचे आदेश

राकेश मारिया यांच्या चौकशीचे आदेश

मुंबई : मुंबई शहरावर झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले आयपीएस अधिकारी अशोक कामटे यांच्याबाबतची सूचना थांबविण्यासह त्यांच्या पत्नी विनिता कामटे यांना दिशाभूल करणारी माहिती दिल्याप्रकरणी मुंबई पोलीस दलाचे प्रमुख राकेश मारिया यांच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी दिले आहेत.
मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी नुकताच एक आदेश दिला होता. आदेशानुसार, राज्य सरकारला चौकशी आयोग कायद्यान्वये एका सेवानिवृत्त न्यायाधीशाच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती स्थापन करण्यास सांगितले होते. ही समिती कामटे यांच्या पत्नी विनिता कामटे यांना राकेश मारिया यांनी दिशाभूल करणारी माहिती दिली होती की नाही, याचा तपास करणार होती. ९ जुलै रोजी रत्नाकर गायकवाड यांनी तीन पानी आदेश जारी केला असून; त्या आदेशात या प्रकरणी दिशाभूल करणारी माहिती देण्यात आल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, दहशतवादी हल्ल्यावेळी नियंत्रण कक्षातून कामटे, विजय साळसकर आणि हेमंत करकरे यांच्याशी झालेल्या संवादाची माहिती विनिता कामटे यांनी माहिती अधिकारातंर्गत मागितली होती. प्रथम ती नाकारण्यात आली होती. आणि नोव्हेंबर २००९ आणि फेब्रुवारी २०१० रोजी त्यांना पुरविण्यात आलेली माहिती अर्धवट आणि विसंगत होती. मारिया हे विनिता कामटे यांना माहिती देण्यास परवानगी देत नव्हते. ही बाब अतिशय बेजबाबदार आहे. या प्रकरणात ते काही माहिती लपवू पाहात आहेत का, असेही यात म्हटले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Rakeysh Maria's inquiry order