राजू शेट्टीही चोरांच्या आळंदीला पोहोचलेत; सदाभाऊ खोतांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2019 20:17 IST2019-03-24T20:16:48+5:302019-03-24T20:17:27+5:30

कोल्हापुरातून महायुती आणि महाआघाडीच्या प्रचाराचा एकाचवेळी नारळ फुटला आहे.

Raju Shetty reach with thieves Alandi; Allegations of Sadabhau Khot | राजू शेट्टीही चोरांच्या आळंदीला पोहोचलेत; सदाभाऊ खोतांचा आरोप

राजू शेट्टीही चोरांच्या आळंदीला पोहोचलेत; सदाभाऊ खोतांचा आरोप

कोल्हापूर : गेली तीस वर्षे ज्यांच्या विरोधात लढलो. पाणी मागायला आलेल्या शेतकऱ्याला गोळ्या घातल्या, उसाला दर मागणाऱ्याला गोळ्या घातल्या त्या लोकांसोबत परिवर्तनाची घोषणा करत असाल तर लाज वाटली पाहिजे. तुम्ही सुद्धा चोरांच्या आळंदीला पोहोचला आहात, असा आरोप सदाभाऊ खोत यांनी राजु शेट्टी यांचे नाव न घेता केला. 


कोल्हापुरातून महायुती आणि महाआघाडीच्या प्रचाराचा एकाचवेळी नारळ फुटला आहे. कराडमध्ये महाआघीडीची सभा झाली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह खासदार उदयनराजे उपस्थित होते. तर कोल्हापुरातील महायुतीच्या सभेला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह चंद्रकांत पाटील आदी उपस्थित आहेत. दोन्ही सभांना कार्यकर्त्यांची मोठी गर्दी लोटली आहे.  


रामदास आठवले यांनी युतीचे 40 ते 42 जागा निवडून आल्या पाहिजेत असे सांगितले. तसेच युतीच्या मंचावर बोलावल्याचे आभार मानले. 

Web Title: Raju Shetty reach with thieves Alandi; Allegations of Sadabhau Khot