“दिलेला शब्द पाळायचा की नाही, हे राष्ट्रवादीनं ठरवावं”; राजू शेट्टींनी करुन दिली बैठकांची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 10:53 PM2021-09-02T22:53:25+5:302021-09-02T22:55:07+5:30

राजू शेट्टी यांनी आपली भूमिका स्पष्ट करत, दिलेला शब्द पाळायचा की नाही हे राष्ट्रवादी काँग्रेसने ठरवावे, असे म्हटले आहे.

raju shetti says that ncp should decide how to keep word given to swabhimani shetkari sanghatana | “दिलेला शब्द पाळायचा की नाही, हे राष्ट्रवादीनं ठरवावं”; राजू शेट्टींनी करुन दिली बैठकांची आठवण

“दिलेला शब्द पाळायचा की नाही, हे राष्ट्रवादीनं ठरवावं”; राजू शेट्टींनी करुन दिली बैठकांची आठवण

Next
ठळक मुद्देदिल्लीत माझी शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली होतीबारामतीमध्ये पुन्हा एकदा शरद पवारांसोबत बैठक झालीराजू शेट्टींनी राष्ट्रवादी काँग्रेसला करुन दिली बैठकांची आठवण

कोल्हापूर: गेल्या काही महिन्यांपासून विधान परिषदेत नियुक्ती करण्यासाठी देण्यात आलेल्या १२ आमदारांच्या यादीबाबत अद्यापही राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे प्रलंबित आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजभवनावर जाऊन भेट घेतली. यातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नावावरून संभ्रम निर्माण झाला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शेट्टी यांच्या नावास आक्षेप घेतल्याचे सांगितले जात असून, राष्ट्रवादी काँग्रेसने शेट्टींचे नाव वगळण्याचा निर्णय घेतल्याचीही एक चर्चा आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी आपली भूमिका स्पष्ट करत, दिलेला शब्द पाळायचा की नाही हे राष्ट्रवादी काँग्रेसने ठरवावे, असे म्हटले आहे. (raju shetti says that ncp should decide how to keep word given to swabhimani shetkari sanghatana) 

“केंद्र सरकारच्या तपास संस्थांमध्ये हस्तक्षेप करुन BJP नेते चौकशा लावतात”; धनंजय मुंडेची टीका

राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबत भाष्य केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेची एक जागा द्यायची हा समझोता लोकसभा निवडणुकीच्या आधी झाला होता. दिल्लीत माझी शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली होती. त्यावेळी राष्ट्रवादीने एक लोकसभा मतदारसंघ आमच्यासाठी सोडावा, अशी आमची मागणी होती. मात्र, त्याऐवजी विधान परिषदेची जागा देण्याचे शरद पवार यांनी मान्य केले होते. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आले. स्वाभिमानीने राष्ट्रवादीला त्या समझोत्याची आठवण करून दिली, असे राजू शेट्टी म्हणाले. 

“BJP नेत्यांनी जवळच्या नशामुक्ती केंद्राशी संपर्क साधावा”; काँग्रेसचा खोचक टोला

एकदा शरद पवारांसोबत बैठक झाली

जून २०१९ मध्ये बारामतीमध्ये पुन्हा एकदा शरद पवारांसोबत बैठक झाली. त्यानंतर विधान परिषदेतील राज्यपाल नामनिर्देशित जागांसाठी पाठवलेल्या नावांमध्ये माझे नाव समाविष्ट केले होते. तेव्हापासून गेल्या सव्वा वर्षात या विषयावर कुणाशीही चर्चा झालेली नाही. कुणालाही भेटलेलो नाही. फोन केलेला नाही. माझ्या नावाबाबत आता जी चर्चा सुरू आहे, त्यात आम्हाला अजिबात रस नाही. तो आमच्यासाठी काही जीवन-मरणाचा प्रश्न नाही. दिलेला शब्द पाळायचा की नाही हे राष्ट्रवादी काँग्रेसने ठरवायचे आहे. स्वाभिमानीचा तो अधिकार आहे. माझे निर्णयाकडे लक्ष आहे, असे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. 

“ठाकरे व पवार पाठीत खंजीर खुपसणारे राजकारणी, हे चंद्रकांत पाटलांचे वास्तववादी भाष्य”

दरम्यान, राज्यपालांच्या भूमिकेबाबत विचारले असता, राज्यपालांना निर्णय घेण्याची सवय नाही. त्यांना आधी निर्णय घेऊ द्या. मग आमदारकी स्वीकारायची की नाही हे ठरवेन, असे राजू शेट्टी म्हणाले. तत्पूर्वी, निवडणुकीत पराभूत झालेल्या व्यक्तीला राज्यपाल आमदार म्हणून नियुक्त करत नाहीत असा नियम असल्याची माहिती मिळाली आहे. आम्ही तथ्य तपासत आहोत. शहानिशा सुरू आहे. यात जर काही अडचण आली, तर मुख्यमंत्री महोदय निर्णय घेतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. 
 

Web Title: raju shetti says that ncp should decide how to keep word given to swabhimani shetkari sanghatana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.