“राजन पाटलांच्या वाया गेलेल्या कार्ट्यांना सत्तेचा माज…”, बाळराजे पाटलांना अजितदादांच्या आमदाराने सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 14:31 IST2025-11-19T14:06:54+5:302025-11-19T14:31:39+5:30
सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपरपरिषदेची निवडणूक बिनविरोध झाली आहे. माजी आमदार राजन पाटील यांची सून या निवडणुकीत बिनविरोध निवडून आली आहे.

“राजन पाटलांच्या वाया गेलेल्या कार्ट्यांना सत्तेचा माज…”, बाळराजे पाटलांना अजितदादांच्या आमदाराने सुनावले
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीची निवडणूक सध्या राज्यभर चर्चेत आहे. ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. अनगरचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव होते. या पदासाठी सुरुवातीला तीन अर्ज दाखल झाले होते. मात्र, यापैकी भाजपा उमेदवाराचा अर्ज वैध ठरला आहे. तर, भाजपा उमेदवाराला आव्हान देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार) उमेदवाराचा अर्ज बाद झाला आहे. तसेच अनगरमध्ये केवळ १७ भाजपा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यांच्या विरोधात अर्ज दाखल झालेले नाहीत, यामुळे अनगरची निवडणूक बिनविरोध झाली आहे.
"अजित पवार नाद करायचा नाही"; मुलाच्या इशाऱ्यानंतर राजन पाटील म्हणाले, "त्याला पार्थ सारखं..."
दरम्यान, काल माजी आमदार राजन पाटील यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. यावेळी बाळराजे पाटील यांनी एका कार्यकर्त्याच्या खांद्यावर बसून जल्लोष करत होते. यावेळी त्यांनी कॅमेऱ्याकडे पाहत म्हणाले, अजित पवार.. सगळ्यांचा नाद करा, पण अनगदकरांचा नाय', ही विधान करत त्यांनी ठेका धरला. या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी संताप व्यक्त केला आहे.
आमदार अमोल मिटकरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर पोस्ट केली. "राजन पाटील आणि त्यांची दोन्ही वाया गेलेली मोकाट कार्टी ह्याना सत्तेचा अति माज आलाय.ज्यांच्या तुकड्यावर जगलात त्यांच्या बद्दल केलेली मस्तीची भाषा याला प्रसंगी योग्य उत्तर देऊच पण तूर्तास या औलादीच्या मस्तीच्या वागण्याने “मालकाला” भिकारी बनवेल..तुर्तास इतकेच", असा टोला मिटकरी यांनी लगावला.
