नाशिक : निफाड तालुक्यातील गारपीटग्रस्त भागांचा दौरा करत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. आत्महत्या हा काही पर्याय नसून त्याने प्रश्न सुटणार नाहीत. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.गेल्या दोन दिवसांपासून नाशिक दौऱ्यावर असलेल्या राज यांनी रविवारी शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. राज ठाकरे हे रुई गावी पोहोचले तेव्हा एका शेतात मंगला दगू फणसे या महिलेने तर त्यांच्यासमोर पदरच पसरत मुलीचे लग्न कसे करायचे, असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर उपस्थितांचे डोळे पाणावले. त्यांच्या मुलीचा विवाह जवळ येऊन ठेपला आहे. राज यांनी सहकार्याचे आश्वासन दिले.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}