Raj Thackeray: भाजपला मतदान करणाऱ्या मराठी लोकांनो...! तुम्हीही वरवंट्याखाली येणार; राज ठाकरेंनी दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 13:38 IST2025-10-19T13:35:19+5:302025-10-19T13:38:19+5:30
Raj Thackeray Speech: गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. य़ावेळी पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना राज यांनी, कोणत्या निवडणुका सुरु आहेत, गेल्या १०-१२ वर्षांतच का प्रश्न पडले, असे सवाल केले.

Raj Thackeray: भाजपला मतदान करणाऱ्या मराठी लोकांनो...! तुम्हीही वरवंट्याखाली येणार; राज ठाकरेंनी दिला इशारा
मतदार याद्यांवरून राज ठाकरे यांनी आज मोठे गौप्यस्फोट केले आहेत. मुंबईत एकेका घरात ८००-८०० मतदार नोंदविले गेले आहेत. विधानसभेनंतर राज्यात ९६ लाख मतदार घुसविले गेले आहेत. अशाप्रकारे आकडेवारी जुळवून सत्ता मिळवायची असेल तर कशासाठी निवडणूक घेताय, असा सवाल राज यांनी केला आहे. याचबरोबर भाजपाच्या मतदारांना देखील राज यांनी इशारा दिला आहे.
गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. य़ावेळी पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना राज यांनी, कोणत्या निवडणुका सुरु आहेत, गेल्या १०-१२ वर्षांतच का प्रश्न पडले. अशाप्रकारे आकडेवारी जुळवून सत्ता मिळवायची असेल तर कशासाठी निवडणूक घेताय. मतदारांच्या प्रतिक्रिया काय आहेत, असे विचारत राज यांनी मतदारांच्या प्रतिक्रिया देखील ऐकवल्या. महाराष्टातील शहरे ही अंबानी, अदानीला आंदण द्यायची आहेत. यांचे काय सुरु आहे, हे मी आधीच सांगितले आहे. पालघरसह आजुबाजुचे जिल्हे जोवर ताब्यात येत नाही तोवर मुंबई हातात घेता येणार नाही. आता वाढवण बंदर येतेय. पुढे विमानतळही जाणार आहे. मुंबई विमानतळावरील सर्व काम नवी मुंबईला नेणार, कार्गो वाढवणला नेणार आणि मग ही विमानतळाची सगळी जमीन अदानीच्या घशात घालणार आहेत, असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.
भाजपाला मतदान करणारी मराठी लोक आहेत त्यांना मला काही सांगायचे आहे. तुम्हाला हे लोक बघणार नाहीत, तुम्हालाही अंबानी, अदानींच्या वरवंट्याखाली हे लोक घेणार. सगळ्या गोष्टीत अदानी. रस्ता बनवायचा अदानी आणखी काही बनवायचे अदानी. संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये एक जमीन पाहिली आहे, तिथे अदानी पॉवर प्रोजेक्ट टाकणार आहे. सगळे विस्थापित होणार. हे जे रस्ते होत आहेत ना तुम्हाला सांगतो मी विकासाच्या आड नाही. हे तुमच्यासाठी नाहीत. हे जमिनी घेत सुटलेले जे उद्योगपती आहेत त्यांच्यासाठी आहेत. मी मुंबईच्या मुळावर उठलेल्यांना खपवून घेणार नाही, असे राज म्हणाले.
आपलीच लोक मुळावर उठलीत. केंद्र हातात आहे, राज्य आहे, उद्या जिल्हा परिषदा आल्या, पंचायत समित्या आला की झालेच सगळे. हे सर्व प्लॅन केलेले आहे, मग सगळा महाराष्ट्र यांच्या ताब्यात. प्रत्येक घरात ८००-८०० मतदार घुसलेत. महाराष्ट्रातील निवडणुका शांततेत पार पाडायच्या असतील तर आधी मतदार यादी स्वच्छ करा, महाराष्ट्राच्या मतदाराचा आदर करा. तरच ही निवडणूक नीट होईल. माझ्या यादी प्रमुखांनी प्रत्येक ठिकाणी कोण कोण, किती लोक राहतात ते एकदा तपासा, शोधायला सुरुवात करा. प्रत्येक पक्षाने घराघरात गेले पाहिजे. तपासले पाहिजे. तोवर महाराष्ट्रात निवडणुका घेऊ नका, आधीच ५ वर्षे बिननिवडणुकांची गेली आहेत. यांची जी घाई सुरु आहे ती यासाठीच सुरु आहे. आज दुपारी तीन वाजता एक सर्वपक्षीय पत्रकार परिषद आहे, त्यात सत्ताधारी देखील येऊ शकतात. पुढचा कार्यक्रम काय आहे, ते सांगण्यात येईल. जिथे जिथे शक्य होईल, सगळ्या तयारीला लागा, असे आदेश राज ठाकरे यांनी दिले.