शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
4
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
5
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
6
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
7
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
8
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
9
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
10
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
11
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
12
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
13
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
14
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
15
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
16
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
17
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
18
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
19
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
20
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन

राज ठाकरेंनी आमच्या गावाची बदनामी केली; हरिसालच्या उपसरपंचांचा FB Live वरून 'स्ट्राईक'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 6:03 PM

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी हरिसाल गावाविषयी दाखवलेला व्हिडिओ पूर्णपणे खोटा असल्याचा आरोप हरिसालचे उपसरपंच गणेश येवले यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून केला आहे. 

अमरावती -  देशातील पहिले डिजिटल गाव असा लौकिक मिळवणाऱ्या हरिसाल गावातील एक व्हिडिओ दाखवत मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी हे गाव डिजिटल झाल्याचा दावा खोटा असल्याचा आरोप सोलापूर येथील सभेमधून केला होता. यावेळी राज ठाकरे यांनी या गावातील एका तरुणालाच थेट मंचावर आणल्याने चर्चेला सुरुवात झाली होती. मात्र मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी हरिसाल गावाविषयी दाखवलेला व्हिडिओ पूर्णपणे खोटा असून, त्यांनी या माध्यमातून हरिसालची संपूर्ण देशभरात बदनामी केल्याचा आरोप, हरिसालचे उपसरपंच गणेश येवले यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून केला आहे.  ''राज ठाकरेंनी आपल्या सभांमध्ये हरिसाल गावाविषयी जो व्हिडिओ दाखवला आहे, तो पूर्णपणे खोटा आहे. तसेच राज ठाकरेंनी हरिसाल गावाची जी देशभरात बदनामी केली आहे ती अतिशय चुकीची आहे, असे हरिसाल गावाचे उपसरपंच  गणेश महादेव येवले यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून म्हटले आहे.. आज जर गावात इंटरनेट नसते तर आज मी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधू शकलो नसतो, अशी भावना  त्यांनी नेटकऱ्यांसोबत बोलतांना यावेळी व्यक्त केली.''''डिजिटल व्हिलेजच्या माध्यमातून आमच्या गावाच्या शाळेत कंप्युटर लॅब देण्यात आली आहे. येथे एचपी, माइक्रोसॉफ्ट, जल्दीफाय अशा कंपन्यांच्या मदतीने तंत्रज्ञान पोहोचले आहे. गावातील इंटरनेट व्यवस्थित काम करत आह, असेही त्यांनी यावेळी सांगितले. राज ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रात हरिसालची बदनामी करत आहेत, त्यांनी केवळ राजकीय फायद्यासाठी हे केले आहे, असेही ते यावेळी म्हणाले. 

हरिसाल गाव जेव्हापासून डिजिटल झाले आहे, तेव्हापासून गावाच्या पर्यटनाला त्याचा फायदा झाला आहे. आम्ही एकूण दहा गाईड या गावात काम करतो. मात्र गावाच्या पर्यटनाविषयी जनतेला  फेसबुक आणि व्हॉट्सअॅपमुळे माहिती मिळाली, असे अशोक आठवले या गावकऱ्याने यावेळी सांगितले. 

 फेसबूक लाईव्हद्वारे राज ठाकरेंच्या आरोपांबाबत मत मांडताना  हरिसाल गावचे उपसरपंच गणेश येवले यांनी यावेळी  गावातील महिला, दुकानदार तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधत गावातील डिजिटल यंत्रणांची वस्तुस्थिती समोर मांडली. तसेच डिजिटल गावामध्ये ऑनलाइन पैसे ट्रांसफर करणे, ड्रायव्हिंग लायसेंससाठी तसेच आधार कार्ड साठी ऑनलाइन फॉर्म भरणे अशा सर्व गोष्टी हरिसाल गावात शक्य असल्याचे, फेसबूक लाईव्हवेळी दाखवून दिले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019AmravatiअमरावतीRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेBJPभाजपा