"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 10:00 IST2025-11-26T09:50:17+5:302025-11-26T10:00:24+5:30
Raj Thackeray On Central Govt: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा डाव सुरू असल्याचा केंद्र सरकारवर आरोप केला.

"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी मुंबईतील आयआयटीच्या कार्यक्रमात 'आयआयटीच्या नावातील 'बॉम्बे' तसंच ठेवले ते चांगले झाले,' असे विधान केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या विधानावरून केंद्र सरकारवर आणि भाजपच्या नेतृत्वावर अत्यंत गंभीर आरोप करत, मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा डाव सुरू असल्याचा आरोप केला.
राज ठाकरे यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सच्या माध्यमातून जितेंद्र सिंह यांच्या विधानाला सरकारच्या मानसिकतेचे प्रतीक म्हटले आहे. ते म्हणाले की,"मुंबई ही मराठी माणसाची आहे आणि मराठी नेत्यांनी व जनतेने मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा डाव पूर्वी उधळून लावला होता. त्याबद्दलची गेली अनेक दशके यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर ओकायला सुरुवात केली आहे." राज ठाकरे यांनी डॉ. जितेंद्र सिंग यांच्यावरही निशाणा साधला. "जितेंद्र सिंग यांचा मुंबई किंवा महाराष्ट्राशी काही संबंध नाही. ते येतात जम्मूमधून. पण आपल्या शीर्ष नेतृत्वाच्या मनात काय चालले आहे ते ओळखून तसे बोलून शाबासकी मिळवणे हाच त्यांचा उद्देश आहे."
'मुंबई' नाव खुपतंय, शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न
राज ठाकरे यांनी 'मुंबई' हे नाव मुंबा आईच्या नावावरून आले आहे, म्हणून हे नाव केंद्राला खटकत असल्याचा दावा केला. "तुम्ही आणि तुमचे शहर यांना खुपतंय. आज केंद्र सरकारने तिकडे चंदिगढ शहर पंजाबच्या हातातून काढून घ्यायचा प्रयत्न केला, त्याला सर्वपक्षीय विरोध झाला म्हणून त्यांनी तात्पुरती माघार घेतली. असाच काहीतरी डाव मुंबईच्या बाबतीत १०० टक्के शिजत असणार. 'मुंबई' नको 'बॉम्बे'च हवं यातून हळूच हे शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न नक्की सुरू आहे."
एमएमआर परिसर गुजरातला जोडण्याचा डाव?
या कटाचा उद्देश केवळ मुंबईपर्यंत मर्यादित नाही, तर संपूर्ण एमएमआर परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी मुंबई आणि एमएमआर परिसरात राहणाऱ्या तमाम मराठी बांधवांना 'आता तरी डोळे उघडा' असे भावनिक आवाहन केले आहे. "येथे आधीच केंद्रीय हस्तक, उद्योगपती इत्यादींनी काय काय ताब्यात घ्यायला सुरु केले आहे, हे आपण रोज पाहतो आहोत, आता तरी मराठी माणसांना हे कळायला हवं!" असे राज ठाकरे यांनी