राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 06:59 IST2025-09-21T06:47:53+5:302025-09-21T06:59:07+5:30

राज्यातील सर्व २९९७ लहान-मोठ्या प्रकल्पांत आजमितीला ८९ टक्के जलसाठा आहे. 

Rain wreaks havoc in the state, dams filled, rivers flooded; 3 lakh 18,859 cusecs released from 35 dams | राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग

राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग

बाळासाहेब बोचरे

मुंबई - गेल्या सहा महिन्यांत राज्यात सरासरीपेक्षा २० टक्के जास्त पाऊस झाला असून, धरणे तुडुंब भरली आहेत. राज्यातील ३५ धरणांमधून एकूण तीन लाख १८हजार ८५९ क्युसेक इतका विसर्ग विविध नद्यांमध्ये सुरू असल्याने नद्यांना पूर आला आहे.

गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात मुसळधार पाऊस झाल्याने पिकांची मोठी हानी झाली आहे. येत्या दोन-तीन दिवसात पावसाचा जोर कमी होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.  राज्यात १३८ मोठी धरणे आहेत. त्यामध्ये ९७ टक्के जलसाठा आहे.  २६० मध्यम प्रकल्प असून, त्यामध्ये  सरासरी ८० टक्के साठा आहे. त्याचबरोबर लघुप्रकल्प २५९९ असून, त्यामध्ये ६१ टक्के साठा आहे. राज्यातील सर्व २९९७ लहान-मोठ्या प्रकल्पांत आजमितीला ८९ टक्के जलसाठा आहे. 

धरणजिल्हाजलसाठा (%)विसर्ग (क्युसेक)नदी
भातसाठाणे99.56%743भातसा
जायकवाडीछ. संभाजीनगर99.23%14670गोदावरी
निम्न दुधनापरभणी75.05%2679दुधना
पूर्णा येलदरीपरभणी97.31%4219पूर्णा
माजलगावबीड96.15%13902सिंदफणा
मांजराबीड100%14508मांजरा
उर्ध्व पैनगंगानांदेड99.51%8484पैनगंगा
तेरनाधाराशीव98.45%3825तेरना
पेंच तोतलाडोहनागपूर99.15%15663पेंच
इटियाडोहगोंदिया100%1017गाढवी
गोसी खूर्दभंडारा62.51%59427वैनगंगा
निम्न वर्धावर्धा78.61%1927वर्धा
उर्ध्व वर्धाअमरावती97.23%4308वर्धा
बेंबळायवतमाळ88.41%3531बेंबळा
अरूणावतीयवतमाळ96.12%1201अरूणावती
पेनटाकळीबुलढाणा94.21%737पेनगंगा
खडकपूर्णाबुलढाणा98.45%12281पूर्णा
इसापूरहिंगोली100%2206पैनगंगा
सिध्देश्वरहिंगोली100%18000पूर्णा
दारणानाशिक100%850दारणा
गंगापूरनाशिक98.85%698गोदावरी
गिरणाजळगाव100%2476गिरणा
हतनूरजळगाव67.06%55123तापी
वाघूरजळगाव97.91%758वाघूर
मुळाअहिल्यानगर100%4000प्रवरा
डिंभेपुणे100%7768घोड
वरसगावपुणे100%742मुळा
खडकवासलापुणे98.41%4661मुळा
पानशेतपुणे100%1130मुळा
घोडपुणे100%3001घोड
आंद्रापुणे100%353अंबी
वीरसातारा100%4626नीरा
उजनीसोलापूर100%24999भीमा
वारणासांगली99.48%3990वारणा
कोयनासातारा100%8500कृष्णा

 

Web Title: Rain wreaks havoc in the state, dams filled, rivers flooded; 3 lakh 18,859 cusecs released from 35 dams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.