शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण भारताला पावसाचा इशारा

By admin | Updated: September 29, 2015 03:14 IST

उत्तर भारतातून परतीच्या प्रवासाला निघालेला मान्सूनही अद्यापही राजस्थान, पंजाब आणि हरियाणातच असल्याची माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून देण्यात आली

मुंबई : उत्तर भारतातून परतीच्या प्रवासाला निघालेला मान्सूनही अद्यापही राजस्थान, पंजाब आणि हरियाणातच असल्याची माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून देण्यात आली. तर दुसरीकडे वातावरणात होत असलेल्या संभाव्य बदलामुळे पुढील ७२ तासांत दक्षिण भारतात मुसळधार पाऊस कोसळेल, असा इशारा स्कायमेटने दिला आहे.मागील दोन आठवड्यांत पश्चिम बंगालसह गुजरात आणि कर्नाटकवर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात ठिकठिकाणी चांगल्या पावसाची नोंद झाली. आता कमी दाबाचे क्षेत्र विरल्याने पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. महत्त्वाचे म्हणजे मागील २४ तासांत राज्यात सर्वत्र हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. २९, ३० सप्टेंबरसह १, २ आॅक्टोबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील ४८ तासांत मुंबईत आकाश ढगाळ राहील.स्कायमेटकडून मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्याच्या शेवटी मान्सूनने तामिळनाडू, केरळ आणि दक्षिण कर्नाटकाच्या आतील भागात चांगली हजेरी लावली. मान्सून परतीच्या वाटेवर असताना पुढील ७२ तासांत दक्षिणेला पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. शिवाय बंगालच्या उपसागरापासून ते उत्तर तामिळनाडूच्या किनारपट्टीला कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे चांगला पाऊस अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)