Rain: अवघे जलमय पंढरपूर! प्राणहानी होता कामा नये, सतर्क राहा मुख्यमंत्र्यांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2020 02:28 AM2020-10-17T02:28:31+5:302020-10-17T02:28:47+5:30

पूर आणि अतिवृष्टीने शेतपिके आणि मालमत्तेचे जे नुकसान झाले त्याचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याची कार्यवाही तत्काळ सुरु करावी.

Rain: Awesome Pandharpur! There should be no loss of life, be careful, instructions of the Chief Minister | Rain: अवघे जलमय पंढरपूर! प्राणहानी होता कामा नये, सतर्क राहा मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Rain: अवघे जलमय पंढरपूर! प्राणहानी होता कामा नये, सतर्क राहा मुख्यमंत्र्यांचे निर्देश

googlenewsNext

मुंबई : राज्यात काही दिवसांसाठी पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही गाफील राहू नका. लोकांना माहिती देत राहा. प्राणाहानी होऊ नये, यासाठी नागरिकांना विश्वासात घेऊन स्थलांतराचे काम करा असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील प्रशासकीय यंत्रणेला अतिवृष्टी व पुरस्थितीत सतर्क राहून काम करण्याचे निर्देश दिले.

मुख्यमंत्र्यांनी शनिवारी पुणे, कोकण, औरंगाबाद व नाशिक विभागीय आयुक्त तसेच या विभागातील जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधून पुरस्थितीचा आढावा घेतला. बैठकीस खासदार अनिल देसाई, खासदार विनायक राऊत, मुख्यसचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता आदी उपस्थित होते.

पूरग्रस्त नागरिकांचे स्थलांतर करताना कोरोनासंदर्भातील उपाययोजनांची काळजी घेण्यात यावी. मास्क, सॅनिटायझर यासारखी सुरक्षा साधने पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावीत. अजूनही काही दिवसांसाठी अतिवृष्टीचा इशारा आहे. आवश्यकतेनुसार भविष्यात करावयाचे स्थलांतर याचेही वेळीच नियोजन करावे, स्थलांतरीत कुटुंबांची योग्य काळजी घेण्यात यावी. पूर ओसरल्यानंतर ते पुन्हा त्यांच्या घरी गेल्यास त्यांना तिथे आवश्यक असणारी मदत पुरवण्यात यावी, अशा सुचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

पूर आणि अतिवृष्टीने शेतपिके आणि मालमत्तेचे जे नुकसान झाले त्याचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याची कार्यवाही तत्काळ सुरु करावी. दुर्देवाने यात जे नागरिक मरण पावले त्यांच्या कुटुंबिंयाना तातडीने आर्थिक मदत देण्याची व्यवस्था करावी, अशा सुचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. शेती, पिकांच्या नुकसानीबरोबरच पशुधन, घरे, रस्ते, पाणीपुरवठा योजना, वीज पुरवठ्याशी संबंधित बाबी, शाळा, ग्रामपंचायत इमारती, प्राथमिक आरोग्य केंद्र याच्या नुकसानीची माहिती घेऊन पंचनामे तातडीने करण्याच्या सुचनाही बैठकीत देण्यात आल्या.

रेस्क्यू पथकाने केली सुटका
प्रदक्षिणा मार्गावर राहत असलेले विठ्ठल पोतदार यांचे निधन झाले. त्यांचा मृतदेह पाण्यामुळे बाहेर काढणे शक्य नव्हते. त्याचबरोबर चंद्रभागा काठी असलेल्या स्मशानभूमीतही पाणी आल्याने अंत्यसंस्कार कुठे करायचे हा पश्न पडला होता. वजीर रेस्क्यू पथकाने त्यांचा मृतदेह बाहेर काढून त्यावर अंत्यसंस्कार केले. सध्या अंत्यसंस्कारासाठी कोर्टी किंवा लक्ष्मीटाकळी येथे जावे लागत आहे.

सोलापूर-विजापूर मार्ग बंद
टाकळी ब्रिज जवळ सीना नदीचे पाणी थांबल्याने श्ुक्रवारी पहाटेपासून सोलापूर- विजापूर महामार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. शिवाय सोलापूर- मंगळवेढा व सोलापूर पंढरपूर हे मार्गही बंद आहेत. सोलापूर जिल्ह्यात आलेल्या पुराने आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला असून शेकडो गावातील पिके उद्ध्वस्त होऊन ५८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील एकूण ६२३ गावांना पुराचा फटका बसला अहे. ८६०६ कुटुंबे स्थलांतरित झाली आहेत. एकूण ३२ हजार ५२१ नागरिकांनी जिल्हा परिषद शाळा, साखर कारखाना तसेच विविध धार्मिक मठांचा आसरा घेतला आहे.

Web Title: Rain: Awesome Pandharpur! There should be no loss of life, be careful, instructions of the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.