Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 09:12 IST2025-09-02T09:11:09+5:302025-09-02T09:12:14+5:30

रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील कासारमलई येथील तीव्र उतारावर रविवारी ब्रेक फेल झाल्याने रिक्षा सिमेंटच्या दिशादर्शकावर आदळली.

Raigad Auto Rickshaw Accident in Mhasala, Three Dead  | Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार

Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील कासारमलई येथील तीव्र उतारावर रविवारी ब्रेक फेल झाल्याने रिक्षा सिमेंटच्या दिशादर्शकावर आदळली. या भीषण अपघात चालकासह तीन जणांचा मृत्यू झाला. कणघर  येथील उद्धवसेनेचे शाखाप्रमुख असलेले रिक्षाचालक संतोष नानासाहेब सावंत (वय, ४०) यांचा जागीच मृत्यू झाला, तर  शांताराम काळीदास धोकटे, शर्मिलाबाई तुकाराम धोकटे यांचा माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या अपघातात प्रकाश धाडवे, कविता संतोष मगर आणि संतोष मगर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी पुढे पाठविण्यात आले आहे. संदेरी येथील समाजाची मिटिंग संपवून रिक्षा कणघर येथे परतत असताना ताम्हाणे शिर्केच्या पुढे कासारमलई येथे अपघात तीव्र उतारावर अपघात झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप कहाले यांनी दिली.

भिवंडी: वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
भिवंडी रांजनोली येथील डायमंड हॉटेलसमोर वाहनाच्या धडकेत ३५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी पहाटे घडली. या प्रकरणी कोनगाव पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल केला आहे. ठाणे-नाशिक मार्गालगतच्या रांजनोली हद्दीतील डायमंड हॉटेल समोरून पहाटे चारच्या सुमारास तरुण चालत जात होता. त्यावेळी अज्ञात वाहनाने तरुणास धडक दिली. तरुण गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तरुणाची ओळख पटविण्याचे तपास पोलिसांकडून सुरू आहे.

आठव्या मजल्यावरून तरुणीने मारली उडी 
मीरा रोड येथे आठव्या मजल्यावरून उडी मारून २१ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. या प्रकरणी काशिमीरा पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. मीरा रोडच्या ठाकूर मॉल जवळील डी.बी. ओझोन गृहसंकुलातील इमारत क्र. १२ मध्ये राहणाऱ्या सिद्धी पंकज कागलीवाल (२१) या तरुणीने ८व्या मजल्याच्या राहत्या घरातून खाली उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी तिचा मानलेला भाऊ ऋषिकेश केडीया याने तक्रार केली. त्यानुसार काशिमीरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची  नोंद केली आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सचिन काशीद हे करत आहेत.

Web Title: Raigad Auto Rickshaw Accident in Mhasala, Three Dead 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.