शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

रेसिंग बनले कमाईचे साधन

By admin | Updated: January 1, 2017 01:43 IST

वेगाच्या नशेसाठी जिवाची बाजी लावणाऱ्या बाइकवेड्या तरुण-तरुणींची बाइक रेसिंगची क्रेझ कॅश करण्यासाठी देशाच्या आर्थिक राजधानीत हिंदी सिनेसृष्टीतील सेलिब्रिटी, राजकीय नेते

(येथे लागते मृत्यूशी पैज - भाग-२)- मनीषा म्हात्रे,  मुंबई

वेगाच्या नशेसाठी जिवाची बाजी लावणाऱ्या बाइकवेड्या तरुण-तरुणींची बाइक रेसिंगची क्रेझ कॅश करण्यासाठी देशाच्या आर्थिक राजधानीत हिंदी सिनेसृष्टीतील सेलिब्रिटी, राजकीय नेते आणि बड्या मोबाइल कंपन्यांचे मालक अवैधरीत्या बाइक रेसिंगचे आयोजन करत असल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत’च्या हाती लागली आहे. मुंबईच्या रस्त्यांवर मध्यरात्रीनंतर होणाऱ्या बाइक रेसिंगसाठी कोट्यवधी रुपयांचा सट्टाही लावण्यात येत आहे. जिवावर उदार होऊन, मुंबईत सुरू असलेल्या रेसिंगवर सध्या बेटिंग सुरू आहे. धक्कादायक म्हणजे, पोलिसांच्या मुलांचीही या रेसिंगमध्ये एक वेगळी टीम आहे.मुंबईच्या वरळी सी लिंक, विक्रोळी पूर्व द्रुतगती मार्ग, पेडर रोड, वांद्रे रिक्लेमेशन सेंटर ही ठिकाणे सध्या रेसिंग पॉइंट झाले आहेत. मुंबईसह ठाणे, नवी मुंबईतून आलेली तरुणाई हाजीअली अथवा नरिमन पॉइंट येथे एकत्र येतात. गुरुवारी, शनिवारी आणि रविवारी रात्री साडे बारा ते पहाटेपर्यंत त्यांचा खेळ सुरू असतो. १ किमीपासून ते ७ किमीपर्यंतच्या अंतरात रेसिंग होते. नाकाबंदी, पोलीस बंदोबस्त याची माहिती ते आधीच घेऊन असतात आणि सुरू होतो, तो रेसिंगचा जीवघेणा थरार. येथे अनेकांना आपल्यामागे बेटिंग सुरू आहे, याबाबत माहितीच नसते. राजकीय नेते, अभिनेते आणि काही बड्या मोबाइल कंपन्यांचे मालक हौसेपोटी त्यांच्या रेसिंगवर बेटिंग लावत असल्याची माहिती रायडर्सने दिली. हजार रुपयांपासून कोट्यवधींमध्ये याचा खेळ रंगतो आहे. एका रेसिंगमागे २० ते २२ लाख लावले जात आहे. कुठल्याही प्रकारची काळजी न घेता, तरुणाई यामध्ये उतरते. यात धक्कादायक बाब म्हणजे, या ग्रुपमध्ये पोलिसांची मुलेही कमी नाही. कुठल्या गुन्ह्यांत अडकलेच तर वडिलांमुळे त्यांची सुटका होते. तर कुठे नाकाबंदी दिसल्यास रायडर्स चुकीच्या दिशेने मागे फिरतात आणि अपघातांना बळी ठरतात. त्यामुळे यांना निर्बंध कुणाचे? असा प्रश्न येथे समोर येत आहे. प्रकार ३६० डिग्री - या प्रकारात रायडर रेसिंग बाइक हवेत तीन वेळा फिरवतो. या सर्व प्रकरांमध्ये ही रेसिंग सर्वात जीवघेणी ठरते. फ्रंट व्हीली स्टंट - बाइकच्या पुढच्या चाकावर गाडी चालवून स्टंट मारणे, जवळपास २ ते ३ किमी अंतर हे पुढच्या चाकावर नेण्यात येते.स्टॉपी व्हीली स्टंट - बाइकच्या मागच्या चाकावर गाडी चालवून स्टंट करणे९० डिग्री - बाइक ९० डिग्रीला सरकवत जमिनीला घर्षण करत चालविली जाते. या दरम्यान निघणारा स्पार्कसाठी हे रायडर्स वेडे असताता. मात्र, यातूनच अनेकदा बाइक एकमेकांवर घसरते.१८० डिग्री - या स्टेजला बाइकवर बसलेल्या रायडर्सची सीटची बाजू पूर्णपणे जमिनीकडे झोकवून दिली जाते.