शहरं
Join us  
Trending Stories
1
ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट... पनवेल, नवी मुंबई, रायगडात पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ
2
Latest Marathi News LIVE Updates: मध्य रेल्वेची सेवा आजही विस्कळीत, डोंबिवली स्थानकावर प्रचंड गर्दी; चाकरमान्यांचे हाल
3
ट्रम्प आता पाकिस्तानचेही ऐकेनात, इराणला दिली उघड धमकी; म्हणाले, “करार होत नाही तोपर्यंत...”
4
Raigad Crime: तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात विवस्त्र अवस्थेत सापडला मृतदेह; लॉजमध्ये हत्या करून आरोपी फरार
5
धडधड वाढली, युद्ध पुन्हा पेटणार? नेतन्याहू म्हणाले, "इराणमधील आमचे मिशन अजून बाकी आहे"; ट्रम्प यांचीही धमकी
6
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
7
IPL 2026: अवघ्या ३० रूपयांनी बदललं Ashwani Kumarचं नशीब; ४ बळी घेत Mumbai Indiansला जिंकवलं!
8
आजचे राशी भविष्य: २१ एप्रिल २०२६: हाती घेतलेली कामे पूर्ण होतील, 'या' राशींना धनलाभाचा योग
9
“महिला आरक्षणावरील चर्चेसाठी CM फडणवीसांनी PM मोदींनाही आणावे”; प्रणिती शिंदेंचे प्रतिआव्हान
10
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
11
शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींची भरभराट, नवीन नोकरीची संधी; उत्पन्नात वाढ, पण बजेट सांभाळा!
12
Learning License: लर्निंग लायसन्स प्रक्रिया पुन्हा 'ऑफलाईन'; गैरप्रकार रोखण्यासाठी आरटीओचे पाऊल
13
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
14
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
15
Ashwini Paul: पार्टनरला भेटायला गेली अन् बनली ड्रग्ज सप्लायर, कोण आहे अश्विनी पॉल?
16
नेस्को ड्रग्ज प्रकरण: अनेक ड्रग्ज पेडलर्स, कॉन्सर्टमध्ये ‘विदाउट तिकीट’!
17
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
18
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
19
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
20
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारीसाठी जातीची समीकरणे जोरात

By admin | Updated: September 13, 2014 02:27 IST

लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेसमोर जातीची समीकरणे टिकली नव्हती, पण या वेळी भाजपासह विविध पक्षांचे इच्छुक उमेदवार आपापल्या जातीला समोर करून उमेदवारी मागताना दिसत आहेत.

मुंबई : लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेसमोर जातीची समीकरणे टिकली नव्हती, पण या वेळी भाजपासह विविध पक्षांचे इच्छुक उमेदवार आपापल्या जातीला समोर करून उमेदवारी मागताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीत राजकीय विश्लेषक, नेते आणि कार्यकर्तेही जातीचे गणित अनेक मतदारसंघांबाबत मांडत होते. अमुक एका जातीची मते अधिक असल्याने त्याच समाजाचा उमेदवार नक्की जिंकेल, असे छातीठोकपणे सांगितले जात होते. प्रत्यक्ष निकालात मात्र मोदी लाटेशिवाय काहीही दिसले नाही. आता पुन्हा एकदा जातीपातीचे राजकारण जोरात आहे. विशिष्ट जातीचे असल्याने आपल्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली तर विजय नक्की असल्याचे वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांकडे उमेदवारीसाठी खेटे घालणारे इच्छुक सांगत आहेत. लोकसभेत जात चालली नाही, त्यामुळे विधानसभेत ती नक्कीच चालेल, असे ते बिनदिक्कतपणे सांगत आहेत. विदर्भात कुणबी, माळी, तेली, मुस्लीम, दलित, आदिवासी, बंजारा समाजांतील विविध पक्षीय इच्छुक आपापल्या समाजाच्या मतदारांची आकडेवारी घेऊन फिरत आहेत. खान्देश; उत्तर महाराष्ट्रात मराठा, लेवा पाटील, आदिवासी, माळी आदी जातींच्या इच्छुकांची गर्दी आहे. पश्चिम महाराष्ट्रात मराठा, वंजारी, धनगर या समाजांतील इच्छुकांची संख्या मोठी आहे. मराठवाड्यात मराठा, वंजारी, धनगर, बंजारा, तेली, धोबी, माळी, मुस्लीम या समाजांच्या इच्छुकांचे प्रयत्न सुरू आहेत.आपापल्या समाजाची शिष्टमंडळे पक्षाच्या नेत्यांकडे पाठविण्याचे प्रमाणही प्रचंड वाढले आहे. समाजात ज्यांना प्रतिष्ठा आहे आणि जे कुठल्या विशिष्ट पक्षात नाहीत, अशांची मनधरणी करून त्यांना इच्छुक उमेदवार नेत्यांकडे पाठवतात. समाजाचे मोठे नेते येऊन विशिष्ट नावाचा आग्रह धरतात, त्यामुळे त्या नावाला वजन प्राप्त होते, असे मानले जाते.