आर. आर. पाटील यांची अँजिओग्राफी

By Admin | Updated: December 17, 2014 00:16 IST2014-12-17T00:11:53+5:302014-12-17T00:16:27+5:30

असे बॉम्बे हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ़ बी़ के़ गोयल यांनी आज, मंगळवारी सांगितले़आर. आर. पाटील यांची अँजिओग्राफी

R. R. An angiography of Patil | आर. आर. पाटील यांची अँजिओग्राफी

आर. आर. पाटील यांची अँजिओग्राफी

तासगाव (जि़ सांगली)/मुंबई : माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आर. आर. पाटील यांच्यावर सोमवारी अँजिओग्राफी झाली. त्यांची प्रकृती स्थिर असून, येत्या चार दिवसांत हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे बॉम्बे हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ़ बी़ के़ गोयल यांनी आज, मंगळवारी सांगितले़
आऱ आऱ यांचे बंधू सुरेश पाटील म्हणाले की, आर. आर. हे एक महिन्यापासून मुंबईतच आहेत. त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात यशस्वी उपचार झाले़ डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. दरम्यान, अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना शनिवारी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांची सोमवारी अँजिओग्राफी केली असून, त्यांची प्रकृती उत्तम आहे़ सध्या ते विश्रांती घेत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: R. R. An angiography of Patil