Pushpak express: कुणाचे हात, तर कुणाचे पाय धडापासून वेगळे; आक्रोशाने हादरला परिसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 20:21 IST2025-01-22T20:20:01+5:302025-01-22T20:21:52+5:30

पुष्पक एक्स्प्रेस अपघात : लखनौवरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसची चैन ओढली गेल्याने भयंकर घटना घडली. यात १२ जणांचा मृत्यू झाला. 

Pushpak express: Some people's hands, some people's legs separated from their bodies; The area was shaken by the outcry | Pushpak express: कुणाचे हात, तर कुणाचे पाय धडापासून वेगळे; आक्रोशाने हादरला परिसर

Pushpak express: कुणाचे हात, तर कुणाचे पाय धडापासून वेगळे; आक्रोशाने हादरला परिसर

Pushpak express Updates: उत्तर प्रदेशातील लखनौवरून मुंबईच्या दिशेने निघालेल्या पुष्पक एक्स्प्रेसमधील १२ प्रवाशांचा मृत्यू झाला. आग लागल्याच्या अफवेमुळे अनेक प्रवाशी गाडीतून उतरले आणि दुसऱ्या रेल्वे रुळावरून पळू लागले. त्याचवेळी आलेल्या कर्नाटक एक्स्प्रेसने अनेकांना चिरडले. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

कर्नाटक एक्स्प्रेसने प्रवाशांना चिरडल्यानंतरची दृश्ये थरकाप उडवणारी होती. चिरडल्या गेल्याने काही प्रवाशांचे हात तुटले गेले. तर काहींचे पाय धडापासून वेगळे झाले. काही अवयव तुटले मृतदेह गाडीच्या खाली पडलेले होते. 

घटनास्थळावरील दृश्य भयंकर होतं. काही मयतांसोबत असलेल्यांनी दे पाहून आक्रोश केला. मदत येईपर्यंत भयावह परिस्थिती घटनास्थळावर निर्माण झाली होती. 

पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्थानकावर समोरुन येणाऱ्या रेल्वेगाडी चिरडून १२ प्रवाशांचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. 

या अपघातात जवळपास ४० जण गंभीर जखमी झाले आहेत. दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दुपारी ४ वाजता पुष्पक एक्स्प्रेस माहिजी-परधाडे स्थानक येण्यापूर्वी एका बोगीत चैन ओढली गेली होती.

त्यानंतर गाडीत आग लागल्याची अफवा पसरली आणि गोंधळ उडाला. त्यामुळे ५० ते ६० जण समोरच्या रुळावर धावले. त्याचवेळी आलेल्या कर्नाटक एक्स्प्रेसखाली प्रवाशी चिरडले गेले. 

रेल्वे बोर्डाच्या माहिती आणि सूचना विभागाचे कार्यकारी संचालक दिलीप कुमार यांनी सांगितले की, 'भुसावळवरून अनेक लोक ट्रेनमध्ये चढले होते. त्यातील एकाने अलार्म चैन ओढली. त्यानंतर ते खाली उतरले. चुकीच्या पद्धतीने रेल्वे रुळ ओलांडण्याचा प्रयत्न केला. रेल्वे उभे राहिल्याने ही दुर्घटना घडली.'

Web Title: Pushpak express: Some people's hands, some people's legs separated from their bodies; The area was shaken by the outcry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.