शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याचे पाणी पेटले!

By admin | Updated: May 4, 2016 03:10 IST

पुण्याच्या हक्काचे पाणी दौंड-इंदापूर तालुक्यासाठी सोडण्याच्या पालकमंत्री गिरीष बापट यांच्या निर्णयावरून मंगळवारी पुण्यात अक्षरश: रणकंदन झाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी

पुणे : पुण्याच्या हक्काचे पाणी दौंड-इंदापूर तालुक्यासाठी सोडण्याच्या पालकमंत्री गिरीष बापट यांच्या निर्णयावरून मंगळवारी पुण्यात अक्षरश: रणकंदन झाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सिंचन भवनात तोडफोड केली. महापालिकेच्या मुख्य सभेतही यावरून रणकंदन झाले. महापौरांनी नगरसेवकांसह जिल्हाधिकारी कार्यालय गाठून पाणी सोडण्याच्या निर्णयाला विरोध केला. शिवसेनेनेही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. कालवा समितीच्या बैठकीला पुण्यातील एका आमदाराला न बोलाविता आणि महापालिकेला विश्वासात न घेता दौंडसाठी एक टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय पालकमंत्री बापट यांनी सोमवारी घेतला. त्याची पहिली प्रतिक्रिया मनसेकडून आली. सकाळी अकराच्या सुमारास मनसेचे कार्यकर्ते घोषणा देत सिंचन भवनात शिरले़ त्यांनी अधीक्षक अभियंता अतुल कपोले यांच्या कार्यालयात शिरुन तेथील टेबलखुर्च्यांची मोडतोड केली़ काचा फोडल्या़ ‘आधी सोडलेल्या पाण्याचा हिशोब द्या, मगच पाण्याला हात लावा’, ग्रामीण भागाला पाणी देण्याला विरोध नाही़ हुकुमशाही पद्धतीला आहे़, अशी पत्रके त्यांनी वाटली. महापालिकेच्या मुख्य सभेतही याचे पडसाद उमटले. बापट यांच्या निर्णयाचा महापालिकेच्या मुख्यसभेत तीव्र निषेध करण्यात आला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेच्या नगरसेवकांनी पालकमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत सभा तहकुब केली. महापौर प्रशांत जगताप यांनी सर्व नगरसेवकांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. पुण्याचे पाणी पळवून देऊ नये, याबाबत मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.१५ जूनपर्यंत पाऊस झाला नाही तर पाणीबाणीशहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या ५.१ टीएमसी इतका पाणीसाठा आहे. ३१ जुलैपर्यंत ३.३ टीएमसी पाणी लागणार आहे. ०.७५ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होण्याचा अंदाज आहे. ०.३३ टीएमसी पाणी पाटबंधारे विभागास तर अमानोरा व नांदेड सिटीसाठी ०.२ टीएमसी पाणी लागणार आहे. जुलैअखेरपर्यंत एकूण ५.३५ टीएमसी पाणी लागणार आहे. प्रत्यक्षात ५.१ टीएमसी इतकेच पाणी धरणात आहे. शिवसेनाही आक्रमकया निर्णयाला शिवसेनेही विरोध केला आहे. शहराध्यक्ष विनायक निम्हण यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांना लेखी निवेदन देऊन पाणी सोडण्यास विरोध केला. पुणेकरांनी थेंब-थेंब बचत करून साठविलेले पाणी बापट यांच्या बालहट्टासाठी दौंड, इंदापूरला कोणत्याही परिस्थितीत सोडून देणार नाही. हा निर्णय त्वरित रद्द करावा, अन्यथा बुधवारी बापट यांच्या घरावर पुणेकर हंडा मोर्चा काढतील, असा इशाराही निम्हण यांनी दिला.